Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सनस्क्रीन की सनब्लॉक?

सनस्क्रीन की सनब्लॉक?
, शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (08:21 IST)
उन्हाळ्यात त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. बाहेरच्या कडक उन्हामुळे त्वचा रापू शकते, काळी पडू शकते. म्हणूनच उन्हात बाहेर पडण्याआधी त्वचेला सनस्क्रीन किंवा सनब्लॉकचं संरक्षण द्यायलाहवं. या क्रीम्समुळे सूर्याच्या अतिनील किरणांना अटकाव होतो आणि चेहर्याकचं सौंदर्य टिकून राहतं. मात्र सनस्क्रीन आणि सनब्लॉक हे दोन वेगळे प्रकार आहेत. या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे हे जाणून घेऊ.
 
* सूर्याच्या घातक किरणांपासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी महिला सनस्क्रीनचा वापर करतात. सनस्क्रीनमुळे सूर्याच्या अतिनील किरणांना काही प्रमाणात अटकाव होतो तर काही किरणं त्वचेपर्यंत पोहोचतात. सनस्क्रीनमध्ये ऑक्सीबेन्जॉन आणि एवोबेन्जोनसारखे घटक असतात. सनस्क्रीन त्वचेत पूर्णपणे शोषलं गेल्यानंतरच पूर्ण क्षमतेने काम करतं. त्यामुळे बाहेर पडण्याच्या किमान 15 मिनिटं आधी सनस्क्रीन लावायला हवं.
 
* सनब्लॉक एखाद्या पुढालीप्रमाणे काम करतं. सनब्लॉकचा थर सूर्याची हानिकारक किरणं त्वचेपर्यंत पोहोचू देत नाही. सनब्लॉकमधल्या टायटॅनियम डायऑक्साइड आणि झिंक डायऑक्साइडसारख्या घटकांमुळे त्याला दाटपणा येतो. सूर्याची अतिनील किरणं त्वचेपर्यंत पोहोचू नयेत, हेच सनब्लॉकचं प्रमुख उद्दिष्ट आहे. म्हणूनच सनब्लॉक लावल्यानंतर तुम्ही लगेच घराबाहेर पडू शकता.
 
* सनस्क्रीन आणि सनब्लॉक यापैकी कशाची निवड करायची हे त्वचेचा पोत, तुमची आवड आणि गरज यावरून ठरतं. नाजूक आणि संवेदनशील त्वचा असेल तर सनब्लॉकचा वापर करणं योग्य ठरतं. त्वचेत त्वरित शोषलं जाणारं उत्पादन हवं असेल तर सनस्क्रीनची निवड करता येईल. एसपीएफ 30 किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचं सनस्क्रीन किंवा सनब्लॉक निवडा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना व्हायरस : कोव्हिड 19मुळे वाढत आहे नैराश्य, विस्मरणाचा धोका