Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Turmeric Hair Dye फक्त 1 चिमूट हळदीने पांढरे केस काळे करा

Hair Growth
, मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (13:24 IST)
Turmeric powder natural hair dye पिवळी हळद तुमचे केस काळे करू शकते हे वाचून तुम्हाला थोडे आश्चर्य वाटेल. पण यात तथ्य आहे. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पिवळ्या हळद पावडरचा वापर केल्याने तुमच्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. तसेच केस काळे होण्यास मदत होईल. चांगली गोष्ट अशी आहे की यामुळे तुमच्या केसांना कोणतीही हानी होणार नाही आणि यामुळे तुमच्या केसांना नैसर्गिक चमकही मिळेल. चला जाणून घेऊया केस काळे करण्यासाठी पिवळी हळद पावडर कशी वापरायची?
 
केस काळे करण्यासाठी या प्रकारे वापरा हळद
यासाठी 1 चमचा हळद पावडर घ्या. लोखंडी कढई गॅसवर गरम करा. यात पावडर टाका आणि जळून काळी होयपर्यंत गरम करा. नंतर गार होऊ द्या. आपली काळी हळदी पावडर तयार आहे.
 
या प्रकारे केसांना लावा
यासाठी ही काळी हळदी पावडर नारळ तेलात मिसळा आणि पांढर्‍या केसांवर लावा आणि किमान 20 मिनिटांसाठी असेच राहू द्या. नंतर पाण्याने धुऊन घ्या. आपले केस काळे आणि शाईनी दिसतील.
 
मधासोबत मिसळा
तयार हळद पावडरच्या मिश्रणात तुम्ही मध मिसळू शकता. यासाठी एका भांड्यात मध घ्या, त्यात जळलेली हळद घाला आणि नंतर ते चांगले मिसळा. तयार मिश्रण तुमच्या केसांवर लावा आणि सुमारे 20 मिनिटे राहू द्या. नंतर आपले केस सामान्य पाण्याने किंवा सौम्य शैम्पूने धुवा. यामुळे तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होतील.
 
तुमचे केस काळे करण्यासाठी तुम्ही चिमूटभर हळद वापरू शकता. तथापि, लक्षात ठेवा की जर तुम्हाला हळदीची कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर अशा परिस्थितीत तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Diabetic Breakfast मधुमेहाच्या रुग्णांनी हे पदार्थ नाश्त्यात खावे, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात