Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

गूळ खाल्ल्याने त्वचा होते तजेलदार आणि केस होतात चमकदार

Benefits of Jaggery for Skin and Hair
, गुरूवार, 14 जानेवारी 2021 (09:07 IST)
आपल्या रोजच्या आहारात कमी अधिक प्रमाणात साखर असतेच. संशोधनातून असे दिसून आले आहे की साखरेपेक्षाही गूळ आरोग्यासाठी अधिक चांगला आहेच पण गुळाच्या सेवनाने तजेलदार त्वचा आणि भरदार निरोगी, चमकदार केस यांचा लाभ होतो. रोजच्या आहारातून काहीशा उपेक्षित राहिलेल्या गुळामध्ये अँटी ऑक्सिडंट, कॅल्शियम, आयर्न व अन्य अनेक खनिजे आहेत. त्यामुळे त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.
 
त्वचेवर अकाली सुरकुत्या येत असतील तर गुळाच्या सेवनाने हे प्रमाण मंदावते. चेहर्‍यावर मुरूमे पुटकुळ्या यांना अटकाव होतो. गुळात पोटॅशियम आहे व ते शरीरातील जादा पाणी कमी करते परिणामी वजन घटण्यास त्याचा हातभार लागतो. त्वचेवरील डाग कमी करण्यासही गूळ महत्त्वाची भूमिका बजावतो व त्यामुळे त्वचा तजेलदार दिसते.
 
गुळात आयर्न म्हणजे लोह विपुल प्रमाणात आहे. त्यामुळे गूळ खाल्ल्याने केस मजबूत व दाट बनतात. शरीरातील विषारी द्रव्ये कमी होतात व त्यामुळे आपोआपच सौंदर्य खुलते. रक्तशुद्धीच्या कामातही गूळ साहाय्यकारी आहे.
 
त्यामुळे रक्तदोषामुळे जे ब्यूटी प्रॉब्लेम निर्माण होतात ते दूर केले जातात. त्यामुळे असा हा बहुगुणी गूळ आहारात अवश्य समाविष्ट करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाल कथा : एक चुकीची इच्छा