Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पांढरे केस काळे करण्यासाठी आवळा पावडर या प्रकारे वापरा

amla
, बुधवार, 20 एप्रिल 2022 (15:23 IST)
अकाली केस पांढरे होण्याची समस्या चुकीच्या आहारामुळे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे होऊ शकते. नैसर्गिकरित्या केस काळे करण्यासाठी आवळा पावडर वापरता येते. आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई सारखे गुणधर्म असतात, ज्यामुळे केसांना अनेक प्रकारे फायदा होतो. केसांच्या वाढीसाठी आणि कोंडा मुक्त टाळूसाठी देखील हे फायदेशीर ठरेल. जाणून घ्या पांढरे केस काळे करण्यासाठी आवळा पावडरचा वापर कोणत्या प्रकारे करू शकता.
 
मेहंदी आणि आवळा पावडर
केसांना रंग देण्यासाठी आवळा पावडर आणि मेंदीची पेस्टही लावता येते. यासाठी पाणी हलके गरम करून त्यात मेंदी आणि आवळा पावडर मिसळा. मेंदी आणि आवळ्याचा हा पॅक रात्री तयार करा आणि सकाळी केसांना लावा. यामुळे केस काळे होतील आणि केसांना पोषण मिळेल.
 
शिकाकाई आणि रीठा पावडर सह
शिकाकाई, रीठा आणि आवळा पावडर लोखंडी कढईत चांगले मिसळा. झाकण ठेवून रात्रभर तसेच राहू द्या. दुसर्‍या दिवशी केसांना लावा आणि तासभर तसेच राहू द्या. एक तासानंतर केस धुवा. हे आठवड्यातून एकदा दोन महिने करा.
 
खोबरेल तेल मिसळा
एका भांड्यात खोबरेल तेल घ्या आणि गरम करा. काही मिनिटांनी त्यात आवळा पावडर घाला. लक्षात ठेवा की तुम्हाला एक चमचा आवळा पावडर 2 चमचे खोबरेल तेलात मिसळावे लागेल. दोन्ही घटक पूर्णपणे काळे होईपर्यंत ते गरम करा. आता थंड होऊ द्या. काही वेळाने केसांना लावा. तासभर ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने केस धुवा.
 
कोरफड आणि आवळा पावडर
कोरफडीची ताजी पाने घ्या आणि त्यांची पेस्ट बनवा. आता आवळा पावडरमध्ये मिसळा. वरून कोमट पाणी घाला. थोडा वेळ थंड होऊ द्या आणि थंड झाल्यावर ही पेस्ट केसांना लावा. 45 मिनिटे ठेवा आणि त्यानंतर केस सामान्य पाण्याने धुवा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

MPSC Recruitment 2022: वैज्ञानिक अधिकाऱ्यांसह या पदांच्या भरतीसाठी नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या