उत्तम आहारासाठी अंड्याचं सेवन उपयुक्त आहे त्याचप्रमाणे त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी अंडे गुणकारी सिद्ध होते. सौंदर्यतज्ज्ञांनी अंड्यातील सौंदर्यवर्धक गुण जाणून घेतले आहेत. अंड्याद्वारे शरीराला विविध प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्सचा पुरवठा होतो. त्याचप्रमाणे बाह्यभागासाठीही अनेक पोषणमूल्ये मिळतात. अंड्याचा वापर करून बनवलेले वेगवेगळे फेसपॅक सौंदर्यवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावतात.
सैल झालेली त्वचा टाईट करण्यासाठी अंड्याचा पांढरा आणि पिवळा बलक फेटून त्यात लिंबाचा रस मिसळावा. हा पॅक पंधरा मिनिटे चेहर्यावर ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाकावा.
चंदन पावडर, मुलतानी माती, ग्लिसरीन आणि अंड्याचा बलक गुलाब पाण्यात एकत्र करावेत आणि हा पॅक चेहर्यावर लावावा. यामुळे वर्ण उजळतो त्याचप्रमाणे रंध्रांमध्ये अडकलेली घाण निघून जाण्यास मदत होते.
सोयाबीनचे पीठ, बेसन, ग्लिसरीन आणि अंड्याचा बलक एकत्रित करून लावल्यास चेहर्यावर चमक येते.
मुलतानी माती आणि अंड्याच्या पांढर्या बलकात लिंबाचा रस घेऊन पॅक लावल्यास त्वचेचा रंग उजळतो.
तिळाचे तेल, अंड्याचा पिवळा बलक आणि लिंबाचा रस यांचे एकत्रित मिश्रण गुणकारी सिद्ध होते.