Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रश्न चेहर्‍यावरील मसचा

प्रश्न चेहर्‍यावरील मसचा
, शनिवार, 26 मे 2018 (14:44 IST)
चेहर्‍यावर आलेला मस किंवा चामखीळ हा सौंदर्याला बाधक असतो. खरेतर मस किंवा चामखीळ शरीरावरील कोणत्याही भागावर येऊ शकतो. पण चेहर्‍यावर एकापेक्षा अधिक मस असणे त्रासदायक वाटते कारण त्यामुळे चेहरा चांगला दिसत नाही. हे मस किंवा चामखीळ घालवण्यासाठी शेकडो उपाय करून पाहिले जातात. पण जर तुम्ही मस किंवा चामखीळमुळे त्रासलेले असाल तर काही घरगुती उपायांनी मस किंवा चामखीळपासून कायमची सुटका मिळवता येईल. 
 
ई जीवनसत्त्व : दिवसातून रोज दोन वेळा ई जीवनसत्त्वाच्या तेलात आले मिसळून मस किंवा चामखीळीवर लावा. एक दोन आठवड्यात मस किंवा चामखीळ निघून जातील. 
 
सफरचंदाचे व्हिनेगर : एका कापसाच्या बोळ्यावर अ‍ॅप्पल व्हिनेगर किंवासफरचंदाचे व्हिनेगर मस किंवा चामखीळ असलेल्या जागी पंधरा मिनिटे चोळावे. रोज याचा वापर केल्यास काही आठवड्यात मस किंवा चामखीळ गळून पडेल.
 
सुक्या अंजीराचा रस : दिवसातून चार वेळा मस किंवा चामखीळ असलेल्या जागी हा रस लावा. काही वेळाने थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. अंजिराच्या रसात असलेले क्षारयुक्त आम्ल मस किंवा चामखीळ यापासून सुटका देईल. 
 
मेथी दाणे : रात्री मेथी दाणे पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी न्याहारीआधी या पाण्याचे सेवन करावे. त्यामुळे मस किंवा चामखीळ निघून जाईल आणि आरोग्यही चांगले राहील. 
 
एरंडेल तेल : एरंडेल तेलात बेकिंग सोडा मिसळून पेस्ट करून ते मस किंवा चामखीळवर लावावे. 2-3 आठवड्यांपर्यंत याचा नियमित वापर केल्यास चामखीळ दूर होण्यास मदत होईल. 
 
ऑरगॉनो ऑईल : ऑरगॉनो ऑईल आणि नारळाचे तेल एकत्र करून रोज चामखीळ किंवा मसवर लावावे. त्यातील अँटी इन्फ्लिमेटरी आणि अँटी ऑकडएटिव्ह गुण यांच्यामुळे मस किंवा चामखीळ काही दिवसात गळून जाईल.
 
कीर्ती कदम 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डायबेटीस रुग्णांना वरदान असलेली बहुगुणी कोरफड