Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Gray Hair Turn Black Again पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी काही टिप्स

Hair Care
पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्याआधी त्याची कारणे समजून घेणे आवश्यक आहे. सामान्यतः पांढर्‍या केसांची समस्या शरीरात पोषणाचा अभाव, चुकीची आणि रासायनिक केसांची काळजी घेणारी उत्पादने, आनुवंशिकता, कोणतीही अंतर्निहित आरोग्य समस्या इत्यादींमुळे असू शकते. वाढत्या वयाबरोबर पांढर्‍या केसांची समस्या खूप सामान्य आहे तर वृद्धत्वामुळे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हातारपणामुळे पांढरे होणारे केस काळे करण्यासाठी तुम्ही फार काही करू शकत नाही. 
 
तथापि निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करून ही प्रक्रिया निश्चितपणे लांबवू शकता. पण चांगली गोष्ट अशी आहे की इतर केसेसमध्ये तुम्ही पांढर्‍या केसांच्या समस्येपासून सहज सुटका मिळवू शकता. जरी यास थोडा वेळ लागेल, परंतु आपल्याला निश्चितपणे परिणाम मिळेल. 
 
पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी काही टिप्स- 
सर्व प्रथम एखाद्या चांगल्या डॉक्टरांशी संपर्क साधा, जेणेकरुन तो तुमच्या केस पांढरे होण्याचे कारण शोधू शकेल. पांढरे केस एखाद्या वैद्यकीय स्थितीमुळे असल्यास, डॉक्टर आपल्याला त्यास सामोरे जाण्यास मदत करेल.
 
जर तुमची समस्या पोषणाच्या कमतरतेमुळे होत असेल तर तुमच्या आहारात बदल करा. आहारात अधिकाधिक फळे आणि भाज्यांचा समावेश करा, पोषक तत्वांनी भरपूर असे पदार्थ खा. तुम्ही आहारतज्ञांकडून तयार केलेला आहार योजना देखील मिळवू शकता.
 
नैसर्गिक केसांची काळजी घेणारी उत्पादने वापरा ज्यात रसायने नसतात. फक्त नैसर्गिक तेल, शॅम्पू, हेअर मास्क इत्यादी वापरा.
आठवड्यातून 2-3 वेळा केसांना तेल लावून चंपी करा.
केस जास्त धुवू नका.
मद्यपान आणि धूम्रपान यांसारख्या सवयी काटेकोरपणे टाळा.
जंक, प्रोसेस्ड, डबाबंद, तळलेले, मसालेदार पदार्थ कमीत कमी खा.
सोडा, सॉफ्ट ड्रिंक्स, एनर्जी डिंक्रस आणि इतर कार्बोनेटेड पेये टाळा.
नियमित व्यायाम, योगाभ्यास केल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाळाच्या गर्भनाळेतलं रक्त का साठवलं जातं? त्यासाठी किती खर्च येतो?