Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वयानुसार ,त्वचेची काळजी कशी घ्याल जाणून घ्या

वयानुसार ,त्वचेची काळजी कशी घ्याल जाणून घ्या
, शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (18:15 IST)
विशीच्या वयात त्वचा मुलायम, मऊ आणि घट्ट असते. त्वचेचा रंग सफरचंदाच्या सालीसारखा दिसतो, पण या वयातसुध्दा मॉइश्‍चरायझर लावणे आवश्‍यक असते. कारण त्वचा मॉइश्‍चर ठेवणाऱ्या पेशी हळूहळू निष्क्रिय होत असतात. मेकअप करण्यापूर्वी मॉइश्‍चरायझर लावावे.
 
तिशीमध्ये त्वचा कोरडी पडायला लागते. थोडीशी पिवळसर किंवा क्रिमी दिसायला लागते. डोळ्यांच्या भोवतालची आणि तोंडाभोवतालच्या त्चचेची काळजी या वयात जास्त घ्यायला हवी. फुल्याफुल्यासारख्या सुरकुत्या दिसल्या तर ते त्वचा कोरडी असल्याचे लक्षण आहे. गालावर आणि कपाळावर हा कोरडेपणा जास्त दिसतो. तुमच्या चेहऱ्यावर केवळ हसण्याच्याच रेषा दिसतात असं नाही, काळजीच्या आणि नाराजीच्या रेषासुध्दा दिसतात. त्या रेषांवर जरा लक्ष द्या.
 
चाळिशीमध्ये डोळ्याखालच्या आणि गळ्यावरच्या सुरकुत्यांकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. तिशीमध्ये त्वचेची काळजी घेतात तशीच चाळिशीमध्येही घ्यावी लागते. त्वचेला सतत 24 तास पौष्टिक घटक कसे मिळतील याचा विचार करायला हवा.
 
चाळिशीच्या शेवटीशेवटी किंवा पन्नाशीला त्वचेची नीट काळजी घेतली नाही तर त्वचा खूप कोरडी आणि सैल पडते.
 
तोंडाभोवती आणि डोळ्याखाली व कपाळावर सुरकुत्यांचे जाळे पसरते. त्वचा निस्तेज व काळसर दिसू लागते. त्वचेखालच्या सूक्ष्म रक्‍तवाहिन्या सहजपणे फुटतात. त्यातून पाझरलेल्या रक्‍तामुळे लालसर जांभळ्या रंगाचे डाग दिसू लागतात. स्नायू सैल झाल्यामुळे हनुवटीखालची त्वचा लोंबायला लागते. ओठांचे कोपरे खाली झुकतात. मानेवर आडव्या रेषा दिसतात. गळ्याचे स्नायू लोंबायला लागतात. पण याची सुरुवातीची लक्षणे दिसताच रोज हलका मसाज आणि क्रीम लावल्याने पुढची लक्षणे दिसणार नाहीत. एक लक्षात ठेवा, फक्‍त झोपतानाच त्वचेची काळजी घ्यायची नसते तर 24 तास काळजी घ्यायची असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोव्हिडमुळे वास घेण्याची क्षमता गेली असल्यास व्हिटॅमिन A ठरू शकतं परिणामकारक