Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

का नाही ओलांडू लिंबू ?

का नाही ओलांडू लिंबू ?
कित्येकदा रस्त्यावरून जाताना चौरस्त्यावर अर्धा कापलेला किंवा सुई टोचलेला लिंबू दिसतो किंवा एखाद्या लाल कापडात गुंडाळलेला असतो. अशावेळी सावध राहून रस्त्यावर पडलेला लिंबू ओलांडू नाही कारण की तो मंतरलेला असून तिथे ठेवण्यात आलेला असू शकतो. जसे की घरातील समस्या, असाध्य रोग किंवा प्रेतबाधा संबंधी तक्रारीपासून मुक्तीसाठी. म्हणून आपल्या रस्त्यावर किंवा चौरस्त्यावर लिंबू दिसल्यास तेथून सांभाळून निघा. त्याला ओलांडून जाण्याची चूक अजिबात करू नये.
 
तंत्र- मंत्र आणि टोटके करण्यासाठी सर्वाधिक लिंबाचा वापर केला जातो. धार्मिक किंवा तांत्रिक कामात बळी देण्यासाठी लिंबू वापरला जातो. याव्यतिरिक्त घरात किंवा ऑफिसमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी याचा वापर होतो. पाहू हे मंतरवलेले लिंबू कश्याप्रकारे नुकसान करू शकतात: 

जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेत बाधाचा प्रभाव होतो, तेव्हा ते उतरविण्यासाठी लिंबू वापरला जातो. यानंतर हा लिंबू एखादा चौरस्त्यावर फेकण्यात येतो. यामागील कारण मानले आहे की जो कोणी या लिंबावर पाय देईल किंवा त्यावरून आपले वाहन नेईल अर्थात त्याला ओलांडेल तेव्हा ज्या व्यक्तीसाठी लिंबू ठेवण्यात आला आहे त्याची बाधा दूर होऊन ज्याने तो ओलांडला असेल त्यावर परिणाम होईल. म्हणूनच रस्त्यावरील लिंबू कधी ओलांडू नये.
 
खूप दिवसांपासून रोग ग्रस्त असलेल्या व्यक्तीवर लिंबाचा टोटका करण्यात येतो. यात लिंबू घेऊन त्यात सुई ने भोक करून रुग्णला ओवाळून अमावसच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी रात्रीच्या वेळी चौरस्त्यावर ठेवला जातो. जो व्यक्ती या लिंबाला ओलांडतो तो आजारी पडतो.
webdunia

व्यवसायात खूप नुकसान झेलत असलेले व्यापारीदेखील रस्त्यावर लिंबू ठेवतात. असे मानले आहे की जो पहाटे सूर्योदयाच्या आधी आपल्या व्यापार स्थळी लिंबू ओवाळून चौरस्त्यावर ठेवतो त्याचे आर्थिक संकट दूर होतात.

webdunia

 
गर्भवती स्त्रियांना रस्त्यावर पडलेल्या लिंबापासून सावध राहयला हवं. गर्भवती स्त्रीला तर आपल्या हाताने लिंबू कापणेदेखील वर्ज्य आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi