Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाण्‍यावर तरंगणारी श्रध्‍दा

पाण्‍यावर तरंगणारी श्रध्‍दा
WD
7 किलो वजनाची मूर्ती पाण्‍यावर तरंगताना तुम्‍ही कधी पाहिलीय? किंबहुना एवढी वजनदार मूर्ती पाण्‍यावर तरंगणे शक्‍य तरी आहे का? त्‍याही पुढे जाऊन या मूर्तीच्‍या पाण्‍यावर तरंगणे अथवा न तरंगण्‍याने हे वर्ष चांगले की वाईट हे आधीच कळणे शक्‍य आहे का? यावेळच्‍या श्रध्‍दा आणि अंधश्रध्‍देच्‍या भागात आपण याच प्रश्‍नांची उत्‍तरे शोधणार आहोत.

मध्य प्रदेशातील देवास शहरापासून 45 किमी अंतरावर असलेल्‍या हाटपीपल्या गावात हिरण्‍यकश्यपू या दैत्‍याचा वध करणा-या नृसिंहाचं एक मंदिर आहे. या मंदिरातील मूर्ती दरवर्षी नदीत तरंगत असल्‍याची भाविकांची श्रध्‍दा आहे. मूर्ती पाण्‍यावर तरंगते तरी कशी हे जाणून घेण्‍यासाठी आम्‍ही हे दृश्‍य आमच्‍या कॅमे-यात बंदिस्‍त केलं.

दरवर्षी भाद्रपद शुध्‍द एकादशीला नृसिंह मंदिरातील या मूर्तीची यथासांग पूजाअर्चा केली जाते आणि अतिशय श्रध्‍दापूर्वक तिला नदीत सोडले जाते. चमत्‍कार पाहण्‍यासाठी परिसरातून हजारो भाविकांची येथे गर्दी होत असते.

webdunia
WD
नृसिंह मंदिराचे प्रमुख पुजारी गोपाल वैष्णव यांनी याबाबत सांगितले, की जर देवाची ही मूर्ती एकदा तरी पाण्‍यावर तरंगली तर वर्षाचे 4 महिने चांगले जातात आणि ती तीन वेळा तरंगली तर संपूर्ण वर्षच चांगले जात असते.

इथले रहिवासी सोहनलाल कारपेंटर हे या मूर्तीचा हा चमत्‍कार गेल्‍या 20-25 वर्षांपासून पाहताहेत. ग्रामस्‍थांची या मूर्तीवर गाढ श्रध्‍दा असल्‍याचे त्‍यांचे म्‍हणणे आहे.

देवाचा हा चमत्‍कार आम्‍ही अनेक वेळा पाहिलाय. या मूर्तीला आम्‍ही आमच्‍या हाताने पाण्‍यात सोडतो यावेळी लाखो लोक इथ उपस्थित असतात, असे मंदिराच्‍या दुस-या एका पुजाऱ्याने सांगितले. ही मूर्ती केवळ तीनच वेळा पाण्‍यात सोडली जाते. गेल्‍या वर्षी ती दोन वेळा तरंगली यंदा मात्र ती केवळ एकदाच तरंगली आहे.

webdunia
WD
मूर्ती नदीत सोडण्‍याच्‍या दिवशी नदीत पाणी नाही असं कधीही घडलेलं नाही. उन्‍हाळ्यात नदी पूर्ण कोरडी झाली. तरीही भाद्रपद एकादशीपर्यंत तिला पाणी येतच, असे ग्रामस्‍थानी सांगितले.

ही मूर्ती पाण्‍यावर तरंगते यामागचे कारण काय असावे.... हा दैवी चमत्कार आहे... की मूर्तीच्‍या दगडातच ती खासियत आहे. तुम्हाला काय वाटतं आम्‍हाला नक्‍की कळवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi