Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फरशीद्वारे रोगनिदान करणारे बाबा

एड्स, कँसर सारख्या असाध्य रोगांवर उपचाराचा दावा

फरशीद्वारे रोगनिदान करणारे बाबा

श्रुति अग्रवाल

ShrutiWD
भारतात अनेक गूढ विद्या प्रचलित आहेत. योग, तंत्र-मंत्र व जडीबुटीच्या साह्याने असाध्य रोगांवर मात करण्याचे दावे येथे केले जात असले तरी त्यात नेहमी तथ्य असतेच असेही नाही. भोंदू बाबा असाध्य रोगांनी ग्रस्त रूग्णांना गंडवून त्यांच्या भावनांशी खेळत असतात. श्रद्धा-अंधश्रद्धेच्या या भागात तुमची अशा बाबांशी भेट घडवून आणणार आहोत. त्यांच्याशी भेटीचा थेट वृत्तांतच आपणापर्यंत पोहचवणार आहोत.

आमच्या त्र्यंबकेश्वरच्या यात्रेदरम्यान नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर रघुनाथबाबांचा आश्रम असल्याचे आम्हांस समजले. लोकांमध्ये ते फरशीवाले बाबा या नावाने प्रसिद्ध आहेत. डोक्यावर फरशी ठेवून रोगाचे अचूक निदान करण्यात त्यांचा हातखंडा असल्याची त्यांची कीर्ती आहे. रोग कोणताही असो असाध्य कोटीतला कॅन्सर किंवा एड्स. या असाध्य रोगांपासून मुक्ती मिळवून देण्याचा दावाही ते करतात. आम्ही त्यांच्या दाव्याला सत्याच्या कसोटीवर घासण्याचे ठरविले. त्यासाठी रघुनाथ बाबांच्या आश्रमात गेलो.

आश्रमात भव्य हॉल होता. हॉलमध्ये शंभरेक जण रांग लावून बसलेले. दिवाणावर बसून एक 40-45 वर्षांची व्यक्ती रूग्णांच्या डोक्यावर फरशी ठेवून काहीतरी पुटपुटत होते. जवळच बसलेले काहीजण रूग्णांसाठी औषधे लिहीत होते. जवळ जाऊन बाबा नेमके काय करतात हे पाहिले आणि आम्ही अवाक झालो. बाबा एकेका रूग्णाच्या डोक्यावर फरशी ठेवून, '' तुझी ब्लड, शुगर कमी झाली आहे, रक्तातील साखरेचे प्रमाण अमुक अमुक आहे... रक्तदाब अमुक अमुक आहे. असे सांगत होते. विशेष म्हणजे हे सांगतानाच रूग्णास कॅन्सर, एड्स, ट्यूमर कोणता रोग आहे हेही सांगत होते.

काहीवेळाने रांगेत बसलेल्या एकाने बाबांसमोर कापड ठेवले.
webdunia
ShrutiWD
बाबा कापडावर फरशी ठेवून रूग्णाची स्थिती सांगू लागले. एका रूग्णाने चक्क आपल्या पत्नीचे छायाचित्र दाखवून तिच्या तब्येतीविषयी बाबांना विचारणा केली. फक्त छायाचित्रावरूनही बाबांनी तिला काय होतेय याची माहिती दिली. बराच वेळांपर्यंत हे चालत राहिले. आलेल्या व्यक्तींच्या डोक्यावर किंवा त्यांनी सोबत आणलेल्या कापड किंवा छायाचित्रावर फरशी ठेवून बाबांचे रोगनिदानाचे कार्य अखंड सुरू होते. आम्ही त्यांच्या सहकाऱ्यांजवळ बाबांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी आम्हांस बगिच्यात पाठवून तेथेच बाबा आपली भेट घेणार असल्याचे सांगितले.

फोटोगॅलरी बघण्यासाठी येथे क्लिक करा....

webdunia
ShrutiWD
बागेत वेगवेगळ्या औषधी वनस्पती होत्या. काही कॅक्टसची रोपेही होती. आम्ही बागेत फिरत असतानाच रघुनाथ बाबांचे आगमन झाले. याच औषधी वनस्पतींपासून औषध तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले. या औषधी वनस्पती कॅन्सर व एड्सवरही गुणकारी आहेत, असे ते म्हणाले. फरशीविषयी विचारले असता ते म्हणाले, 'हा गुरूंचा आशीर्वाद आहे. मी पुष्कळ दिवस आदिवासींमध्ये राहिलो. त्यांच्याकडूनच मला दुर्मिळ जडीबूटींची माहिती मिळाली.

उपचारादरम्यान मी त्यांचाच उपयोग करतो.' आपला दावा खरा सेल तर या उपचार पद्धतीचे पेटंट का घेत नाही? असे विचारले असता, त्यांनी चलाखीने उत्तर देणे टाळले. बाबा म्हणाले, कॅक्टसपासून बनविण्यात आलेल्या ताईतामुळे रूग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तर आयुर्वेदिक औषधे रोगास समूळ नष्ट करतात.

रघुनाथबाबांशी चर्चेनंतर आम्ही येथे येणार्‍या रूग्णांना येथे
webdunia
ShrutiWD
येण्यामागचे कारण विचारले. ओळख न देण्याच्या अटीवर मुंबईहून आलेल्या एका तरूणाने आपल्याला एड्स असल्याची माहिती दिली. एड्स असाध्य आहे हे माहित आहे. पण मित्राने बाबांकडे यावर उपचार असल्याची माहिती दिल्याने आपण आलो असल्याचे त्याने सांगितले. आशेवरच जग टिकून आहे, मीही आशेनेच येथे आलो आहे हे सांगायलाही तो विसरला नाही. युवकाप्रमाणेच बालाजी शेखावत ब्रेन ट्यूमरने ग्रस्त आपल्या मुलीवर उपचार करण्यासाठी येथे आले होते.

त्यांच्या कंपनीतील एका व्यक्तीस डॉक्टरने ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान केले होते. बाबांकडे उपचार घेतल्यानंतर ते बरे झाले. मुलगीही ठीक होईल, या आशेनेच आपण आल्याचे ते म्हणाले. सर्वजण याच आशेवर रघुनाथ बाबांच्या आश्रमात आले होते.

webdunia
ShrutiWD
पण बाबांची एकूणच सखोल चौकशी केल्यानंतर मात्र आश्चर्यकारक बाब समोर आली. बाबांच्या दाव्यानुसार त्यांचे वय सत्तरच्या आसपास असले तरी ते 30-35 वर्षाचे दिसतात. मात्र, त्यांच्या मुलाचे वय फक्त 21 वर्षे आहे. आणखी अवाक करणारी गोष्ट म्हणजे येथे येणार्‍या प्रत्येकास देण्यात येणारे औषध एकच होते. दम्यावर प्रभावशाली असलेले औषध एड्स किंवा कॅन्सर कसा काय बरा करते ते एक रघुनाथबाबाच जाणे. याप्रमाणेच तेल व ताईतही सर्वाना सारखेच देण्यात येत होते. एकूणात येथेही अज्ञानी, भोळ्या-भाबड्या लोकांना फसविण्याचा व्यवसाय सुरू असल्याचाच निष्कर्ष निघतो.


फरशीवाल्या बाबांवरील आरोप -
फरशी वाले बाबा प्रशिक्षित नसतानाही रूग्णांवर उपचार कसे करू
webdunia
ShrutiWD
शकतात असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी केला आहे. याबाबतीत त्यांनी 21 जुलै 2006 मध्ये बाबांविरुद्ध प्राथमिक गुन्हाही नोंदविला आहे, मात्र त्यांच्यावर वर आजपर्यंत कारवाई झालेली नाही. नाशिकमध्ये त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन फरशीवाले बाबा भोळ्याभाबड्या लोकांना गंडवत असल्याचा आरोप केला. त्र्यंबकेश्वरचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जोशी यांनी 2006 मध्येच या प्रकरणाची दखल घेतली होती. प्राथमिक गुन्हा नोंदवून एक वर्ष होऊनही कसलीही कारवाई झालेली नाही. समितीने याबाबत शासकीय स्तरावर आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi