Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लाथेने उपचार करणारा मंसाराम...

लाथेने उपचार करणारा मंसाराम...

श्रुति अग्रवाल

WDWD
रूग्णांवर उपचार करण्याच्या विविध पध्दती असतात, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण लाथ मारून, थप्पड मारून इलाज केला जातो, असे सांगितले तर तुम्हाला पटेल का? पण हे खरे आहे. आज श्रध्दा-अंधश्रध्दाच्या या भागात आम्ही रूग्णांवर उपचार करण्याची एक वेगळीच पध्दत दाखविणार आहोत.

छत्तीसगड या राज्यातील मनसाराम निसाद नावाचा माणूस अशा प्रकारे उपचार करतो. लाथ मारून, कानपटा‍त मारून आपण रूग्णाला बरे करतो, असा दावा हे महाशय करतात.

छत्तीसगडची राजधानी रायपुर येथून जवळपास 75 किलोमीटर दूर आणि धमतरी शहरापासून 35 किलोमीटर अंतरावरील लाडेर नावाच्या गावातील ही व्यक्ती अशा विचित्र तर्‍हेने इलाज करते. आम्ही लाडेर गावात पोहचलो तेव्हा मनसारामकडून उपचार करून घेण्यासाठी हजारोंच्या वर लोकांनी गर्दी केली होती. काही वेळाने मनसाराम इथे येऊन एका झाडाखाली बसला आणि त्याने एकानंतर एक रूग्णाला लाथ, थप्पड मारायला सुरूवात केली. इतर रूग्ण रांगेत उभे राहून आपला नंबर यायची वाट बघत होते.

webdunia
WDWD
ही विद्या या महाशयांकडे आली तोही एक दैवी संकेत आहे, असा त्याचा दावा आहे. तो यापूर्वी एक सामान्य शेतकरी होता. तीन वर्षापूर्वी देवी त्याच्या स्वप्नात आली आणि देवीने लोकांचे दु:ख दूर करण्याचा आदेश त्याला दिला असे तो सांगतो. तेव्हापासून त्याचे अशा विचीत्र पध्दतीने उपचार करणे सुरूच आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपण कित्येक वर्षापासून जेवलेलो नाही, असा त्याचा दावा आहे.

हळू हळू मनसारामच्या इलाजाची ख्याती आजूबाजूच्या परिसरात पसरली. मग लांबून लांबून लोक त्याच्याकडे इलाजासाठी यायला लागले. आता तर त्याच्याकडे इलाजासाठी रांगा लागतात.

मनसाराम उपचारासाठी पैसे घेत नाही. पण रूग्ण त्यांना काही ना काही भेट देतात. रोग बरा करण्यासाठी रूग्णांना मनसारामकडे तीन वेळा जावे लागते. त्यामुळे साहजिकच तीन वेळा लोक त्यांना भेट देतात. उपचारासाठी इथं एवढी गर्दी होते, की त्यांच्यासाठी इथं खास एक हॉटेल सुरू झाले आहे. त्या हॉटेलवाल्याचीही चांगली कमाई होते.

मनसारामकडे उपचारासाठी येणार
webdunia
WDWD
रूग्ण अशिक्षित आणि गरीब असल्याचे आमच्या निदर्शनास आले. त्यांना आरोग्य सुख सुविधांबद्दल फारसी माहीती नसते. त्यामुळे ते मनसारामकडे उपचारासाठी गर्दी करतात.

अशा पध्दतीने इलाज केल्यावर म्हणे मनसाराम अतिशय आनंदी होतात. पण या सगळ्या बाबी प्रसिध्दीसाठी पसरवल्या असाव्यात हे सहज कळते. अशा विचित्र उपचार पध्दतीबाबत तुम्हाला काय वाटते? ते आम्हाला जरूर कळवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi