लग्न सराईची घाई सुरु झाली की तयारी करणे घरच्यांसाठी एक मोठी परीक्षाच असते. त्यातून सर्व ठरल्यावर मोसम कसा राहील ही काळजी सतत सतावते. लग्नात पाऊस पडला तर घराती आणि वराती दोघांसाठी मुष्किल वाढते. परंतू काही जागी लग्नात पाऊस पडणे शुभ असल्याचे मानले आहेत. याने भाग्य उजळतं आणि यश मिळतं असेही मानले आहे. खरंच लग्नात पाऊस पडणे शुभ आहे का? आपल्यालाही हा प्रश्न असल्यास हे वाचा:
लग्न आपल्या जीवनातील सर्वात सुखाचा दिवस असला पाहिजे. हा दिवस प्रेम, सुख, आशा, उमेद आणि उत्साहाने भरलेला असावा. पाऊस फलदायी असतो कारण याने कोरड पडलेल्या जागांना पाणी मिळतं, चांगलं पिक येतं अर्थातच हे चांगल्या भाग्याचे प्रतीक आहे. हे लक्षात घेता लग्नाच्या दिवशी येणारा पाऊस चांगला नशीब असल्याचे लक्षण आहे. अनेक कारणांमुळे पाऊस चांगल्या भाग्याचे लक्षण दर्शवतं. पाऊस आशीर्वाद, स्वच्छता, एकता आणि एक नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. काही ठिकाणी तर याला कुटुंब वाढवण्याचे प्रतीक मानले आहे.
आशीर्वाद आणि समृद्धी
नवीन आविष्य सुरू करताना आशीर्वाद मिळवणे हाच एक मुख्य उद्देश्य असतो. प्रत्येकाला आशीर्वादाची गरज असते. पाऊस आशीर्वाद स्वरूप जीवनात समृद्धी येण्याची आशा जगवतो. लग्न म्हणजे संसाराला नवीन सुरुवात अशात समृद्धी देणारा पाऊस पडणे म्हणजे आशीर्वाद समजावे.
नवीन सुरुवात
पावसानंतर चोहींकडे हिरवागार आणि स्वच्छ दिसायला लागतं. प्रत्येक गोष्ट ताजेतवानी दिसते. तसेच संसार सुरू करत असणार्यांना पाऊस एक नव्या सुरुवातीचे सूचक आहे.
कुटुंब वाढण्याचे चिन्ह
पाऊस कुटुंब वाढण्याचे संकेत आहे. पाण्याने पिक उगवतं आणि वाढतं. तसेच लग्नानंतर अपत्य प्राप्तीसाठी हे फलदायी आहे. काही लोकांप्रमाणे लग्नात पाऊस आल्याने कुटुंब वाढण्याचे संकेत मिळतात. ही शुभ गोष्ट आहे.
भौतिक संपत्ती
भौतिक संपत्तीमध्ये वृद्धी होणे अर्थात भौतिक धन-धान्य प्राप्त होणे. म्हणूनच हे संसाधने, उत्पादकता, आणि चांगले पीक इत्यादीचे प्रतीक आहे.