हिंदू धर्मात पूर्वजन्माला सत्य मानले गेले आहे. तसेच कोणती आत्मा कशा प्रकारे पुन्हा जन्मास येते हे देखील स्पष्ट केले गेले आहे. कोणती आत्मा भटकत राहते, कोणती पुनर्जन्म घेते याबद्दल काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. काही आत्मा काही काळासाठी पितृलोक, स्वर्गलोक, नरक लोक किंवा इतर लोकात राहून पुन्हा पृथ्वीवर येते. याबद्दल शास्त्र म्हणतात की आठ असे मुख्य कारणं आहेत ज्यामुळे आत्मा पुन्हा जन्म घेते. आत्मा आपला ठराविक काळ एखाद्या लोकात राहून पुनर्जन्मासाठी तयार होते. तर जाणून घ्या ते कारण ज्यामुळे आत्म्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो.
1. प्रभूची आज्ञा : देव एखाद्या विशेष कार्यासाठी महात्मा आणि दिव्य पुरुषांच्या आत्म्याला पुन्हा जन्म घेण्याची आज्ञा करतात.
2. पुण्य संपल्यावर : संसारात केलेल्या पुण्या कर्माच्या प्रभावामुळे व्यक्तीची आत्मा स्वर्गात जाऊन सुख भोगते आणि पुण्य कर्मांच्या प्रभावामुळेच आत्मा दैवीय सुख प्राप्त करते. जेव्हा पुण्य कर्मांचा प्रभावा नाहीसा होतो तेव्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो.
3. पुण्याई भोगण्यासाठी : कधी-कधी एखाद्या व्यक्तीद्वारे अती पुण्य कर्म घडतात आणि मृत्यूनंतर ते पुण्याईचे फल भोगण्यासाठी आत्म्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो.
4. पाप भोगण्यासाठी : पुण्याई प्रमाणेच पापाचा घडा भरलेला असल्यास ते भोगण्यासाठी देखील जन्म घ्यावा लागतो.
5. सूड घेण्यासाठी : कधी-कधी आत्मा एखाद्याकडून सूड उगवण्यासाठी देखील पुनर्जन्म घेते. एखाद्या व्यक्तीला धोका, छळ किंवा यातना देऊन त्याने प्राण गमावले असल्यास आत्मा पुनर्जन्म अवश्य घेते.
6. परतफेड करण्यासाठी : एखाद्याचे आपल्यावरील उपकार चुकवण्यासाठी त्यांची परतफेड करण्यासाठी देखील आत्मा पुनर्जन्म घेते.
7. अकाल मृत्यू झाल्यास : अशात अपघातात मृत्यू झाल्यामुळे अनेक गोष्टी राहून जाण्याची खंत असते म्हणून पुनर्जन्म घेण्याची इच्छा बळकट असते.
8. अपूर्ण साधना पूर्ण करण्यासाठी : काही आत्मा आपली अपूर्ण राहिलेली साधना पूर्ण करण्यासाठी पुनर्जन्म घेतात.