Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निजलेल्या माणसास का ओलांडून जावू नये ? असे अनेक प्रश्नांचे उत्तर

निजलेल्या माणसास का ओलांडून जावू नये ? असे अनेक प्रश्नांचे उत्तर
, गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (16:44 IST)
१) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ?
उत्तर :- ती यमाची मृत्यूची दिशा आहे. यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो.
 
२) स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये?
उत्तर :- ही सौभाग्य देणारी आहे म्हणून.
 
३) देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी ?
उत्तर :- ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी उर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी.
 
४) शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी.
उत्तर :- शिवसुत्र आहे महादेवाचे. रद्रगण, पितृगण, लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात. त्याना प्रदक्षिणा होईल म्हणून.
 
५) एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत ?
उत्तर :- प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अव्दैताची पुजा करतात, व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून.
 
६) गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये ?
उत्तर :- हा मंत्रराज आहे, ज्या मंत्राना बीज असतात, ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही. त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून ....
 
७) शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत ?
उत्तर :- शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचे प्रतिक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग, कलह प्राप्त होतो म्हणून ..
 
८) निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र का घालू नये ?
उत्तर :- तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे. म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही. नाहीतर तम तत्व वाढेल. राक्षसी संकटे येतील म्हणून.
 
९) देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत ?
उत्तर:- त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून ...
 
१०) विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये ?
उत्तर :- फुले ही देवतांची पवित्रके आहेत. विष्णुतत्त्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तीस्वरुप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून ..
 
११) शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये ?
उत्तर :- शिवाचा तमभाव आहे व झांजेतुन तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून...
सूर्य हा अग्नी तत्त्वाचा आहे व शंखनादही अग्नीतत्वाचा आहे दोन्हीही शक्ति एकरूप झाल्यावर रज कणाचे घर्षण होते. सुक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणुन...
देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो. शक्तीतत्व ह्या नादात पोकळीत रहात नाही. ती हिरण्यगर्भा आहे. ती प्रसूति वैराग्य आहे ..
 
१२) आपली जपमाळ व आसन कधीही दुस-यास वापरण्यास का देवू नये ?
उत्तर:- त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते. ते दुस-यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो.
 
१३) देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे.
उत्तर :- हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत. 
अंगठा -आत्मा/ 
तर्जनी -पितर/
मध्यमा-स्वतः/अनामिका -देव/करंगळी -ऋषी /
म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे...
 
१४) समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती का असाव्यात सम का असू नयेत.
उत्तर :- विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून......
 
१५) अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये.
उत्तर :- पितराना दोष लागतो म्हणून.
 
१६) उंब-यावर बसून का शिंकू नये.
उत्तर :- उबरा हा मुळात बसण्यासाठी नाही तेथे सर्वतिर्थे बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपशकुन घडतो म्हणून..... घडल्यास पाणी शिंपडावे......
 
१७) निजलेल्या माणसास का ओलांडून जावू नये.
उत्तर :- झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून ..
 
१८) मांजराना प्रेत ओलांडून का देवू नये.
उत्तर :- प्रेत प्रेतच राहते म्हजे पिशाच्च योनित जाते त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून ..
 
१९) रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नयेत किंवा दुस-यास का देवू नयेत ?
उत्तर :- याच्यात करणीतत्व आहेत. आकर्षण क्रिया पटकन होते व बळीतत्त्व आहे म्हणून ....
 
२०) सायंकाळी केर का काढु नये?
उत्तर :- लक्ष्मीला आवडत नाही. लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते...
 
२१) रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा.
उत्तर :- शव= शिव म्हणून नमस्कार करावा....
 
२२) कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे ?
उत्तर :- येणे घडते नाहीतर कायमचे जाणे होते...
 
२३) एका हाताने देवाला नमस्कार का करू नये. 
उत्तर :- दश इन्द्रियाचा नमस्कार मह्त्वाचा असतो. पंचतत्त्वाचा नाही ...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऋषी पंचमी 2020 विशेष: कधी आहे ऋषी पंचमी व्रत कैवल्य, या उपवासाचे नियम, पूजाविधी आणि व्रताचे महत्त्व जाणून घेऊ या...