Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शोरूमच्या घड्याळी का दाखवतात फक्त 10.10ची वेळ?

शोरूमच्या घड्याळी का दाखवतात फक्त 10.10ची वेळ?
, सोमवार, 11 मार्च 2019 (13:29 IST)
कधी ना कधी तुमचेही ह्या गोष्टीकडे लक्ष गेले असेल की कितीही मोठे घड्याळीचे शोरूम असो किंवा लहान दुकानं, तेथे ठेवलेल्या सर्व घड्याळींचे काटे 10.10 वर असतात. पण तुम्हाला या मागचे कारण माहीत आहे का? घड्याळीला या वेळेवर सेट करण्यामागे बर्‍याच कथा प्रसिद्ध आहे. तर जाणून घेऊ आपण का म्हणून दुकानात आणि जाहिरातीत घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांवर थांबलेली असते.  
सेड फेस बदल्यासाठी   
आधी टायमेक्स आणि रोलेक्स सारख्या प्रसिद्ध कंपन्या आपल्या घड्याळीचे वेळ 8.20 मिनिटावर ठेवत होते ज्याने त्यांच्या कंपनीचे नाव ग्राहकांना स्पष्टपणे दिसू शकेल.  पण त्यानंतर त्यांना जाणवले की एक सेड फेस अर्थात दुखी चेहरा बनलेला आहे ज्याने लोकांवर निगेटिव्ह प्रभाव पडू शकतो.  
 
2. आनंदी चेहरा  
8.20 ला नकारात्मकतेचा सूचक मानणार्‍या कंपन्यांनी याला बदलायचा निर्णय घेतला आणि त्याबदले याचे उलट दिसणारे 10.10ची वेळ निवडली. जर तुम्ही लक्ष दिले तर हा आनंदी असलेल्या चेहर्‍या सारखा दिसतो.   
webdunia
3. या वेळेपासून बनते विक्ट्रीचे निशाण 
जेव्हा घड्याळीत दहा वाजून दहा मिनिट होतात तेव्हा तास आणि मिनिटांच्या काट्यांची स्थिती इंग्रचीच्या V अक्षराप्रमाणे दिसते. हे 'वी' विक्ट्री अर्थात विजयाचे प्रतीक आहे. घड्याळीला खास वेळेवर सेट करण्यामागे एक कारण असे ही होऊ शकते.  
 
4. कंपनीचे नाव दाखवण्यासाठी 
घड्याळ निर्माते आपले नाव 12 अंकाच्या खाली लिहितात आणि 10.10ची वेळ निवडल्यामुळे लोकांचे नावाकडे लगेचच लक्ष जाते. ही वेळ आता घड्याळ कंपन्यांची मार्केटिंग स्ट्रेटजीचा भाग बनला आहे.   
 
5. हिरोशिमा-नागासाकी परमाणू हल्ल्याशी संबंध 
हिरोशिमावर जेव्हा लिटिल बॉय नावाचा परमाणू बॉम्बं पाडण्यात आला होता तेव्हाची वेळ 10.10 होती आणि त्या हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यासाठी घड्याळ निर्मात्यांनी ह्या वेळेची निवड केली. पण या गोष्टीला पूर्णपणे खरे मानणे अशक्य आहे कारण नागासाकीवर झालेल्या हल्ल्याची वेळ सकाळची 8.10 मिनिट असे होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

छत्रपती संभाजी राजे