या मंदिराजवळच नागाचे एक वारुळ असल्याची माहिती मंदिराचे पुजारी महेश कुमार शर्मा यांनी दिली. तसेच जवळच नदी असल्याने अनेकदा या भागात नागही दिसतो परंतु उंदीर आतापर्यंत कधीही प्रत्यक्षात कोणीही पाहिले नाही, केवळ त्यांची विष्ठाच आढळून येते. या मंदिराची नियमित साफसफाई केली जाते, तरीही उंदराची विष्ठा या भागात आढळून येते असे शर्मा म्हणाले. आम्ही लहानपणापासुनच या मंदिराविषयी ऐकत आलो आहोत, आणि पहात आहोत या मंदिरातील नाग पीवळ्या रंगाचा असल्याचे आम्ही ऐकले आहे परंतु गावातील रमेशचंद्र झाला वगळता त्या नागाला अद्याप कोणीही पाहीले नसल्याची माहिती गावातील कमल सोनी आणि केदारसिंह कुशवाह यांनी दिली. 12 ते 15 फुटांचा हा नाग पहाणे अत्यंत शुभ असल्याचे ते मानतात.
मंदिराजवळच घर असल्याने दररोज ब्रह्ममुहूर्तावर मंदिरातील घंटांचा आवाज ऐकू येतो तेव्हा मन प्रसन्न होत असल्याचे सांगतानाच अमावस्या आणि पोर्णिमेला पुजार्याने पुजा करण्या आधीच कोणीतरी पुजा केल्या प्रमाणे मंदिर स्वच्छ असल्याचे अनेकदा आढळून आल्याचे शेरसिंह, विक्रमसिंह आणि केदारसिंह कुशवाह यांनी स्पष्ट केले.
उंदरांप्रमाणेच सोमवती नदीही या मंदिराला प्रदक्षिणा घालत असल्याचे गावकर्यांचे मत आहे.हे मंदिर अतिप्राचिन असून या विषयीच्या अनेक अख्यायीका पुर्वजांकडून ऐकल्याची माहिती गावचे सरपंच विजयसिंह चौहान यांनी दिली.
या मंदिराच्या नुसत्या दर्शनानेच अनेक दु:ख दूर होत असल्याची श्रद्धा आहे या मंदिराचा घुमटही अतिप्राचिन आहे. परंतु मंदिराच्या भिंती बौद्ध काळात बांधण्यात आल्याचे जाणवते. राजा गंधर्वसेन उज्जैनचे राजे विक्रमादित्य आणि भर्तृहरि यांचे वडील होते.
मंदिराची कथा तर आपण ऐकली आता आपल्याला ठरवायचे आहे, की ही सत्यकथा आहे का अंधविश्वास?