मांत्रिकाच्या सांगण्यावरून अशी घोषणा केली गेली की गावाबाहेरून आलेल्या लोकांनी त्वरित गाव सोडून निघून जावे. आणि केवळ गावातील लोकांनीच गावात राहून भूत पळविण्यासाठी होणा-या पूजा-पाठ आणि यज्ञ कार्यात सहभागी व्हावे. या आदेशानुसार सर्व धार्मिक विधी पूर्ण केले गेले. दरम्यान भूताला पळवून लावण्याचा दावा करणारा मांत्रिकाने भूत पळविण्यासाठीचे प्रयत्न सुरूच ठेवले. शेवटी संपूर्ण गावाच्या सीमेवर दूध टाकून सीमांकित केले गेले. यानंतर आता गावात भूत नसल्याचे मांत्रीकाने पटवून दिले.
माणसाच्या आकलन शक्तीच्या पलीकडे गेलेल्या गोष्टीला तो चमत्कार, देव-देवता किंवा मग भूत-बाधा अशा संकल्पनांमध्ये बांधून ठेवत असल्याचे नेहमीच घडते. त्याच्या याच अज्ञानतेचा फायदा काही लोक उचलतात. आणि लोकांच्या भावनांना हात घालून त्यांची पिळवणूक करीत असतात. पदोपदी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करणा-या आजच्या या शिक्षित व्यवस्थेत भूताच्या गोष्टीवर विश्वास ठेवून मुर्ख बनणे कितपत योग्य वाटते? तुम्हाला याबाबत काय वाटतं? आम्हाला नक्की कळवा.