आज बळी दिला जात नसला तरीही ही प्रथा अंगावर काटे आणणारी आहे. भाविक काटेरी फांद्या आपल्या अंगाला बांधून जमिनीवर लोळण घेतात. आणि देवीला आपले रक्त अर्पण करतात. पणयानीच्या नवव्या दिवशी गावकरी मंदिरात जातात आणि काटेरी फांद्या, नारळाच्या फांद्या अंगाला बांधतात. पणयानी संध्याकाळी सात वाजता सुरू होते. मध्यरात्री मंदिराचे मुख्य पुजारी भाविकांना प्रसाद वाटतात. हा प्रसाद मिळाल्यानंतर भाविक विविध ठिकाणांहून काटेरी फांद्या एकत्रित करतात. त्यानंतर त्या फांद्या आपल्या अंगाला बांधून मंदिराला प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा केवळ उत्तर दिशेनेच केली जाते. प्रदक्षिणेनंतर काटे काढून टाकले
जातात आणि शरीरातून येणारे रक्त एकत्रित करून काली मातेची पूजा केली जाते. अगदी नरबळीची आठवण यावी अशी ही प्रथा आहे. भाविकांना मात्र, या प्रथेत काहीही हिंस्त्र असल्याचे वाटत नाही. आपल्याला कोणताही त्रास होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रथेविषयी काय वाटते? आम्हाला जरूर कळवा.
(व्हिडिओ व चित्र पणयानी.कॉम)