Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानी सैनिकांना धडा शिकविणारी घंटियाळी माता

पाकिस्तानी सैनिकांना धडा शिकविणारी घंटियाळी माता
, शनिवार, 8 ऑक्टोबर 2016 (12:08 IST)
जैसलमेरपासून 150 किमीवर असणार्‍या चमत्कारी तनोट माता मंदिराची माहिती आपण पूर्वीच घेतली आहे. या देवीची धाकटी बहीण असलेल्या घंटियाळी माता मंदिराची ही कथाही अनोखीच आहे. 
 
हे मंदिर तनोट माता मंदिराच्या अलीकडे पाच किमीवर आहे. येथेही भारत पाक युद्धाच्या वेळी अनेक चमत्कार मातेने दाखविले होते व या मंदिराच्या पूजाअर्चेची जबाबदारीही सीमा सुरक्षादलाकडेच आहे.
 
माता घंटियाळी दरबार अशा नावाने हे स्थळ प्रसिद्ध आहे. येथील पुजारी सुनील अवस्थी यांनी या मंदिरात घडलेले अनेक चमत्कार सांगितले. विशेष म्हणजे 1965 व 1971 अशा भारत पाक युद्धातच हे चमत्कार घडले होते. पुजारी सांगतात 1965 च्या युद्धात पाक सैनिक दोन बाजूंनी हल्ला चढवित होते पण या मंदिराजवळ येताच समोरासमोर येत असलेल्या या दोन्ही सैनिकी तुकडय़ांचा गोंधळ उडाला व त्यांनी समोरच्याला शत्रू समजून आपल्याच सैनिकांना ठार केले होते. या मंदिरात घुसलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी मातेचा शृंगार उतरविण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे सैनिक पूर्ण आंधळे झाले होते. 
 
हे मंदिर 800 ते 1200 वर्षे प्राचीन आहे व मातेचा सिद्ध दरबार अशी त्याची प्रसिद्धी 1971 च्या भारत-पाक युद्धापासून झाली आहे. प्रत्येक युद्धाच्या वेळी या मातेने भारतीय सैनिकांची पाठराखण केली आहे व त्यामुळे तिची पूजाअर्चा करण्याचा मान सीमा सुरक्षादलाकडेच आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री'