Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाण्याद्वारे रोग बरे केले जातात...

पाण्याद्वारे रोग बरे केले जातात...

भीका शर्मा

WD
श्रद्धा आणि अंधश्रद्धाच्या या भागात आम्ही आपल्याला घेऊन जातोय दिल्लीतल्या इंदिरा देवींकडे. कोणत्याही प्रकारचा आणि कितीही गंभीर असलेला रोग आपण बरा करू शकतो, असा त्यांचा दावा आहे. कॅन्सर असो वा ट्यूमर, डायबिटीस असो वा पोलिओ... यापैकी कोणत्याही रोगावर त्या उपचार करतात.

webdunia
WD
इंदिरा देवींच्या उपचाराची पद्धतही काहीशी वेगळी आहे. रूग्णाला ज्या जागी रोगाचा संसर्ग झालाय, तेथे त्या पाणी शिंपडतात आणि तेच पाणी नंतर त्याला प्यायला देतात. या पाण्याबरोबरच फूल आणि केळं प्रसाद म्हणून दिलं जातं. इंदिरा देवी भलत्याच ‘फेम’ आहेत. म्हणून त्यांच्याकडे इलाजासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या असतात. आपल्याकडे देवाने शक्ती दिलीय, म्हणूनच आपण हे करू शकतो, असे त्या सांगतात. आपल्या नुसत्या स्पर्शाने लोकांची दुःखे दूर होतात, असं त्यांचं म्हणणं आहे.

webdunia
WD
इंदिरा देवीवर लोकांचाही खूप विश्वास आहे. रूग्णाचे नातेवाईकही अतिशय भक्तीभावाने उपचारासाठी येतात. इंदिरा देवींनी कितीही वेळा बोलावले तरी यायची त्यांची तयारी असते. इंदिरा देवींच्या उपचार पद्धतीमुळे किती जणांचे रोग बरे झाले याचा काहीही पुरावा मिळालेला नाही. पण तरीही लोकांचा त्यांच्यावरील विश्वास कायम आहे.

या प्रकाराविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला जरूर कळवा.
फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा...

Share this Story:

Follow Webdunia marathi