त्यांना बाबांचा आदेश मिळाल्यानंतर भूतबाधित महिला येथील चिखलात आंघोळ करतात आणि झाडावर चढून विचित्र पद्धतीने आपली व्यथा त्या झाडाला सांगतात. यासंदर्भात संतोष नावाच्या एका कथित भूतबाधिताशी आम्ही बोललो. मी माझ्या समस्येविषयी अनेक डॉक्टरांना भेटलो. परंतु त्यांच्या औषधातून कोणताही फरक न पडल्याने आपण या दर्ग्याला शरण आल्याचे संतोषने स्पष्ट केले.
या झाडावर चढणे तितकेसे सोपे नाही. परंतु, येथे येणार्या भूतबाधित महिला बाबांच्या आदेशावरून त्यावर चढतात. यानंतर या दर्ग्यातील काझी त्या महिलेच्या केसांना एक लिंबू बांधून, त्याच झाडाला केस आणि लिंबासह एक खिळा ठोकतात, त्या महिलेच्या केसांचा तेवढा भाग नंतर कापून तिला त्यातून मुक्त केले जाते आणि यानंतर त्या महिलेला भूतबाधेतून मुक्ती मिळते अशी येथे येणार्यांचे ठाम मत आहे. या झाडावर चढल्यानंतर भूतबाधा दूर होते अशी अनेकांची धारणा असल्याने येथे येणार्यांची संख्या मोठी आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन ही परंपरा सुरुच असल्याचे येथील रहिवासी सांगतात.
आपल्याला भूतबाधा झाली असल्याचे सांगत येथे अनेक जण येतात. आपल्याला येथे आल्यानंतर चांगले वाटल्याचेही अनेकांचे मत आहे. येथे बाबांच्या दर्ग्यावर दोरा बांधून नवसही केला जातो.