Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुमताजचा आत्मा भटकतोय....

मुमताजचा आत्मा भटकतोय....
बादशाह शाहजहान ने आपली पत्‍नी बेगम मुमताज महलच्‍या प्रेमाखातर बनविलेल्‍या जगप्रसिध्‍द ताजमहलबद्दल तर आपण ऐकलंच आहे. पण आपल्‍यापैकी खूप कमी जणांना हे माहीत असतं की ताजमहल बनविण्‍यास लागलेल्‍या कालावधीच्‍या काळात मुमताजचे पार्थिव मध्य प्रदेशातील ब-हाणपूरच्‍या बुलारा महालात दफन करण्‍यात आले होते. इथल्‍या लोकांच्या मते आजही या महालात मुमताजचा आत्मा भटकत असतो.

WD
सुमारे 400 वर्षांपूर्वी मुगल साम्राज्‍याची बेगम मुमताजचा मृत्‍यू ब-हाणपूरच्‍या बुलारा महालात झाला. पत्‍नीवर निस्‍सीम प्रेम करणा-या शहाजहानने ब-हाणपूरलाच ताजमहल बनविण्‍याचा निर्णय घेतला. मात्र ते कुठल्‍याशा कारणामुळे शक्‍य झाले नाही. नंतर जेव्‍हा ताजमहल बनविला तेव्‍हा ब-हाणपूरला दफन केलेले मुमताजचे शरीर आग्र्यातील ताजमहालात पुन्हा दफन करण्‍यात आले. मुमताजचे शरीर शहाजहानने आग्र्याला नेले तरी तिचा आत्मा आजही याच बर्‍हाणपूरमध्ये भटकतो आहे. तिची कबर आग्य्राला हलविल्‍याबद्दल ती खूप दुःखी आहे, असे येथील लोक म्हणतात.

इथल्‍या रहिवाशांच्या मते या महालातून मुमताजचा रडण्‍याचा आवाज नेहमीच ऐकू येत असतो. असं असलं तरीही इथं येणा-यांपैकी कुणालाही मुमताजच्‍या आत्‍म्‍याने कोणताही त्रास दिला नाही.

webdunia
WD
1631 मध्‍ये एका मुलीला जन्‍म दिल्‍यानंतर काहीच दिवसात बेगम मुमताजचं निधन झालं. त्‍यामुळेच तिचा आत्‍मा या महालात भटकत असातो, असे रहिवाशी सांगतात. बर्‍हाणपूरच्‍या या पडलेल्या वास्तूत खरोखरच मुमताजचा आत्मा भटकत असेल का? की ही अफवा पसरवून त्‍या आड काही बेकायदा काम करणा-यांनी खेळलेली ही एक चाल असेल? तुम्‍हाला याबाबत काय वाटतं. जर तुमच्‍याकडेही अशा कुठल्‍या ठिकाणांची माहिती आहे, तर आम्‍हाला जरुर कळवा...

Share this Story:

Follow Webdunia marathi