Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रंग बदलणारे शिवलिंग

रंग बदलणारे शिवलिंग

अरविंद शुक्ला

WDWD
श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या रेषा खूपच पुसट असतात. त्यामुळे नेमके कशावर विश्वास ठेवावा हे कळत नाही. आता हेच पहाना काशी विश्वनाथाच्या वाराणसी नगरातील मंदिरांसहित राजधानीतल्या शिवमंदिरातील शिवलिंगाचाही रंग बदलल्याचे बोलले जात आहे. एकाच दिवशी अनेक शिवलिंगाचा रंग बदलण्याची घटना म्हणजे काही वर्षांपूर्वी गणपतींने दूध पिण्याच्या घटनेशी मिळतीजुळती आहे.

लखनौच्या चारधाम मंदिरात रविवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास काही भक्तांना मंदिरातील काळ्या दगडातील लिंगाच्या काही भागाचा रंग पांढरा झालेला आढळला. शिवलिंगाच्या रंग बदलल्याची माहिती मिळताच भाविकांनी मंदिराकडे धाव घेतली.

त्यांनी भजन-कीर्तनास सुरवात केली. यानंतर चर्चेस उधा
webdunia
WDWD
आले. मंदिराच्या विश्वस्त व प्रसिद्ध कुंदनलाल ज्वेलर्सचे अतुल अग्रवालही रानीकटरा येथील चारधाम मंदिरात सहकुटुंब पूजेसाठी आले. त्यांनीही हा चमत्कार पाहिला. चौपाटीया येथील चारधाम सिद्धपीठ मंदिराचे पुजारी पंडित सियाराम अवस्थी तर या घटनेस इश्वरी चमत्कार मानतात. जुन्या लखनौचा हा भाग छोटी काशी म्हणून प्रसिद्ध आहे. चारधाम मंदिर व मोठ्या कालीमातेचा आशीर्वाद या ठिकाणास लाभला आहे.

प्राचीन लखनौत असलेल्या चारधाम मंदिरात रामेश्वरम, बद्रीनाथ, केदारनाथ, द्वारकाधीश व जगन्नाथपुरीचे साक्षात दर्शन लाभण्यासोबतच स्वर्ग व नरकाचेही येथे दर्शन प्राप्त होते, असे मानले जाते.

मंदिरातील पुजारी पंडित सियाराम अवस्थी द्वारकाधीश मंदिराची प्रतिमा पुरातत्व सर्वेक्षण विभागाद्वारे नोंदणीकृत असल्याचे सांगतात. चारधाम मंदिरातील रामेश्वरम मंदिर हे रामेश्वर येथील मंदिराच्या धर्तीवर बांधण्यात आले आहे. शिवलिंगाच्या आसपासच्या परिसरातच लंकेस जाण्यासाठीचा रामसेतू व त्यानंतर रावण दरबार होता, असे एक मत आहे.

webdunia
WDWD
येथे आता रंगरंगोटीचे काम सुरू आहे. या ठिकाणाशिवाय इतरत्र रावण दरबाराचे दर्शन घडत नाही. रामेश्वरमच्या नावाने बनलेल्या येथील मंदिरातील शिवलिंगाचाही रंग बदलला. भाविक व मंदिरातील पुजारी पंडित सियाराम अवस्थी या घटनेचा संबंध सध्या गाजत असलेल्या रामसेतू प्रश्नाशी जोडत आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री करूणानिधी यांचे रामविरोधी वक्तव्य व भारतीय पुरात्तत्व विभागाने चुकीचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने बहुतेक हा चमत्कार घडला असावा, अशी शक्यता ते वर्तवतात.

webdunia
WDWD
लखनौमधील रानीकटरा भागातील संतोषी माता मंदिरातील शिवलिंगाच्या रंग बदलण्याने भाविकांना आश्चर्याचा धक्का बसला. जुन्या मंदिरातील पांढर्‍या शिवलिंगातही लाल रेषा उमटल्याने भाविक अवाक झाले. एवढेच नाही तर नंदीचाही रंग बदलला. याच मंदिरात ‍शंकराचे डोळेही समोर आल्याचे निदर्शनास आले. संतोषी माता मंदिरातील पुजारी चंद्रशेखर तिवारी यांनी वीस वर्षांपासून आपण मंदिरात पुजा करीत असलो तरी असला चमत्कार पहिल्यांदाच बघितल्याचे सांगतात.

परमेश्वरावरील श्रद्धा अढळ व्हावी यासाठी देवच चमत्कार घडवत असल्याचे ते सांगतात. भगवान राम व शकराचे अस्तित्व नाकारणार्‍यांना ईश्वर चमत्कार घडवून दैवी शक्तीवर विश्वास दृढ करण्यास भाग पाडतात. त्यांच्या मते मनातील भावनेनेच परमेश्वराचे दर्शन घडत असते. वेळेनुरूप येथील मंदिरातील शिवलिंग पूर्वस्वरूपात येत आहे.

भाविकांच्या मते रविवारी दिसणारी शिवलिंगातील लाली हळूहळू काळ्या दगडाचे रूप घेत आहे. रानीकटरा चौपा‍टीया येथील रहिवासी मधुबाला, योगिता सिंह, वंदना पांडे, ब्रजेश पांडे, अजितकुमार शर्मा, मनोज मिश्रा यांनीही हा चमत्कार पाहिला. हा चमत्कार असल्याचे त्यांचे मत आहे.

शिवलिंगाच्या रंग बदलण्याच्या घटनेनंतर मंदिरा
webdunia
WDWD
भाविकांच्या गर्दीत वाढ झाली. माहितीनुसार चारबाग, सरोजीनगरच्या गौरी गावातही अशाच घटना घडल्या आहेत. पुरातत्व विभागाचे उपसंचालक पी. के. सिंह यांनी शिवलिंगाचा रंग बदलण्याची घटना शास्त्रीय संशोधनाचा विषय असल्याचे सांगितले. त्यांच्या विभागाद्वारे संरक्षित मूर्तींच्या बाबतीत आजपर्यंत अशी घटना नोंदवली गेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवलिंगाचा रंग बदलण्याच्या घटनेचा संबंध पुरातत्व शोधाशी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयटीआरसीचे माजी संचालक डॉ. पी. के. सेठ यांच्याकडून यासंबंधात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मत नोंदवण्यास असमर्थतता दर्शवली.

Share this Story:

Follow Webdunia marathi