Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रामायण सप्‍ताहाने बदलले गावचे रूपडे !

-अनिरुद्ध

रामायण सप्‍ताहाने बदलले गावचे रूपडे !
WD
श्रध्दा असेल तर शंकाच नाही. विज्ञानाच्या प्रगत युगात रामायण पठणाने एखाद्या गावाचा चेहरा-मोहरा बदलून त्या गावात समृध्दी नांदत असेल तर याला काय अंधश्रध्दा म्हणाल? नाही ना ! चला तर मग श्री रामाच्या नामस्मरणात मग्न झालेल्या मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यामधील तिवडिया या गावाला.

हे गाव आहे तसे छोटे. पण गावातील प्रत्येक नागरिक श्रीरामाचे नामस्मरण करतो. नित्य त्याची पूजा करतो. 14 वर्षांपूर्वी संपूर्ण गावात रोगराई पसरली होती. दुष्काळाची छाया होती. या संकटातून बाहेर पडण्यासाठी ग्रामस्थांनी तेथे असलेल्या श्रीराम भक्त हनुमान मंदिरात अखंड रामायण सप्‍ताहाचे आयोजन केले होते. तेव्हापासून तिवडिया हे गाव सर्व संकटांपासून मुक्त झाले. हा चमत्कार श्रीरामाच्या कृपेचाच प्रसाद आहे यावर ग्रामस्थांची श्रध्दा आहे. तेव्हापासून गावात अखंड रामायण सप्‍ताहाची परंपरा सुरू झाली. आजही ती सुरु आहे.

webdunia
WD
हनुमान मंदिराचे पुजारी धर्मेंद्र व्यास यांनी सांगितले, की अखंड रामायण पाठ सुरू झाल्यापासूनच गावात समृद्धी नांदू लागली आहे. सुरूवातीला गावाची भूजलपातळी 300 फूटापेक्षाही खाली गेली होती. पण रामायण पाठ झाल्यानंतर आता 30 ते 40 फूटावरच पाणी लागते. काही भागात तर पाच फूटावरच पाणी यायला सुरूवात होते.

एका ग्रामस्थाने सांगितले, की अखंड रामायण सप्‍ताह सुरू झाल्यापासून ग्रामस्थांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे. प्रत्येक नागरिक जागरूक झाला असून सर्वत्र समृध्दी नांदत आहे. तिवडिया गावाच्या संदर्भात सांगायचे झाल्यास येथे आजपर्यंत कोणती विपरित घटना घडलेली नाही.

webdunia
WD
मंदिराचे पुजारी धर्मेंद्र व्यास यांनी आणखी एक चमत्कारीक घटना सांगितली. नवरात्र उत्सवाच्या दरम्यान मंदिराच्या छतावर एकदा वीज कोसळली. मात्र, मंदिरात रामायणाचा अखंड पाठ करणार्‍या भक्तांना कुठलीही इजा पोहचली नाही. तसेच येथील मानसिक संतुलन हरवलेले गोरेलाल पवार ही व्यक्ति अखंड रामायाण पाठाच्या प्रभावामुळे आनंदात जीवन जगत आहे.

या प्रकाराबाबत आपल्याला काय वाटते. आम्हाला जरूर कळवा.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा.....

Share this Story:

Follow Webdunia marathi