Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्पर्शाने रोगमुक्त करणारा ब्रह्मगुरू

स्पर्शाने रोगमुक्त करणारा ब्रह्मगुरू

शशिमोहन

WDWD
लोकांची श्रद्धा कधीकधी आपली सीमा ओलांडून अनेकदा इतकी पुढे जाते की आपण अंधश्रद्धेच्या प्रांतात आलोय हे त्यांना कळतही नाही. त्यामुळेच अनेक भाकड वाटणार्‍या कथांवरही विश्वास ठेवला जातो. कोणत्याही व्याधी किवा रोगावर उपचार करायचा झाल्यास त्यास औषधाशिवाय पर्याय नाही. पण केवळ बोटांच्या स्पर्शाने रोग बरे करण्याचा दावा करणार्‍या व्यक्तीकडे उपचारासाठी रांगा लागतात हे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण ही खरी बाब आहे.

ब्रह्मज्ञानाच्या आध्यात्मिक शक्तीवर आधारीत ही उपचार प्रणाली आहे. त्यासाठी आम्ही आपला मोर्चा केरळकडे वळवला. निसर्गसुंदर अशा या केरळमध्ये आचार्य एमडी रवी मास्तर हे 'ब्रह्म गुरू' आम्हाला भेटले. हे गुरू रोगांवर आपल्या कोमल स्पर्शाने उपचार करतात. विशेष म्हणजे त्यांचे उपचार नि:शुल्क आहेत. एमडी रवी मास्तर कुणी डॉक्टर नाहीत. व्यवसायाने ते शिंपी आहेत. त्यांचे शिक्षणही यथातथाच झाले आहे. पण तरीही ते उपचार करतात. अगदी असाध्य रोगांवरही

त्यांना पुनर्जन्मातून रोगांवर उपचार करण्याची विद्या प्राप्त
webdunia
WDWD
झाली आहे. या शक्तींचे ज्ञान झाल्यावर सामान्य व्यक्तीसही महान योगीपद प्राप्त होते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे उपचार केंद्र ब्रह्म धर्मालय नावाचे प्रसिद्ध आहे. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील चंगनास्सेरी येथे त्यांचे हे धर्मालय आहे. थिरूवनंतपुरम येथून हे ठिकाण साधारणत: 135 किलोमीटर तर कोच्चीहून 87 किलोमीटरवर आहे. आपल्या प्रार्थनेवेळी कोणत्याही देवी-देवतांशी आपण संवाद साधू शकत असल्याचा दावा रवी मास्तर करतात.

मात्र, आपण परमेश्वर किवा त्यांचा अवतार नसल्याचीही त्यांना खा‍त्री आहे. त्यांच्या मते लोकांच्या सेवेसाठी त्यांना ही शक्ती प्राप्त झाली आहे. कोणत्याही औषधाशिवाय ब्रह्मज्ञानाच्या आधारे ते उपचार करू शकतात.

webdunia
WDWD
कोणत्याही रोगाचा उपचार आपण कोमल स्पर्शाने करतो, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या हातातून निघणारी ब्रह्मशक्ती रोगांवर परिणामकारक असल्याचा त्यांचा दावा आहे. 'सोरायसिस' सारख्या चर्मरोगावर औषध शोधण्यात आतापर्यंत कुणास यश आले नाही पण रवी मास्तराकंडेही त्याचा उपाय आहे. त्यांच्या ब्रह्म चिकित्सा केंद्रात अनेका मानसिक व शारीरीक व्याधींनी ग्रस्त लोक उपचारासाठी येतात.

फोटो गॅलरी बघण्यासाठी येथे क्लिक करा....

webdunia
WDWD
आश्रमात कोणत्याही देवी-देवतांची पूजा-आरती करण्यात येत नाही. त्यांना प्राप्त सर्व व्यापी शक्ती सर्व देवादिकांपेक्षाही श्रेष्ठ असल्याचे मानण्यात येते. व्यसनमुक्तीसाठीही दूरवरून त्यांच्याकडे लोक येतात. त्यांच्या हातातून निघणारी उर्जा म्हणे रूग्णांना असह्य होते आणि ते रोगमुक्त होतात, असे बोलले जाते. सर्व व्याधी नकारात्मक प्रवृत्तीचा परिणाम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या उपचाराद्वारे ते रोग्यास शांती प्राप्त करून देतात.

रवी मास्तर 'ब्रम्ह गुरू' कसे झाले ?

रवी मास्तरांचा जन्म 1953 मध्ये कोट्टायम जिल्ह्याती
webdunia
WDWD
त्रिवानांचूर येथे झाला. लहानपणापासूनच लोकांचे भविष्य वर्तवण्याची त्यांना आवड होती. त्यांनी वर्तविलेले भविष्य सत्य झाल्यावर नातलग व मित्र आश्चर्यचकित व्हायचे. मोठे झाल्यावर त्यांनी शिंप्याचा व्यवसाय स्वीकारत आपल्या क्षेत्रात कौशल्य प्राप्त केले. त्यानंतर एका ख्रिश्चन महिलेशी त्यांचा विवाह झाला. त्यांना मुलगाही झाला. पण त्याचे वजन फक्त साडेसातशे ग्रॅम होते.

तो चालू किवा पाहू शकत नसल्याचे नंतर निष्पन्न झाले. अनेक तज्ज्ञास दाखविले तरी काहीही लाभ झाला नाही. परमेश्वराच्या उपासनेतूनच यावर काही उपाय निघेल असा विश्वास ठेवून त्यांनी उपासनेस सुरवात केली. जानेवारी 1993 मधील घटना आहे. ते पूजेसाठी दिवा लावत असताना चमत्कारीक शक्ती त्यांच्या शरीरातून आरपार झाली.

webdunia
WDWD
पुढ्यात ठेवलेला दिवा आपल्या स्वयंप्रकाशाने झगमगत असल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. या प्रकाराने ते अतिशय गोंधळले. तेवढ्यात त्यांच्या कानी मधूर ध्वनी पडला. ''घाबरू नकोस! विश्वाचे संचलन करणारा मी ब्रह्मा आहे. मी तुझ्यात सामावलो आहे. लाखो लोकांना उपचार करून तू त्यांच्या व्याधींचे हरण करशील. आपल्या पुत्राची काळजी करून नकोस, चार दिवसांत तो बरा होईल. रवी मास्तरांना हे सारे स्वप्नवत वाटले. मात्र, चार दिवसांनी त्यांचा मुलगा स्वत:च्या पायावर उभा राहून त्याला दृष्टीही प्राप्त झाली.

webdunia
WDWD
तेव्हापासून त्यांनी ब्रह्माच्या आदेशाच्या पालनास सुरवात केली. नकारात्मतेमुळे निर्माण होणार्‍या रोगांच्या निवारणाचे कार्य त्यांनी हाती घेतले. कॅन्सर, सोरायसीस या रोगांवरही त्यांनी उपचार केले. त्यांचा दावा आहे, की आपण मानवतेच्या सेवेसाठी स्वःला वाहून घेतले आहे. त्यासाठी ते रूग्णांकडून पैसेही घेत नाहीत. आतापर्यंत आठ लाख लोकांनी त्यांच्या ब्रह्म ज्ञान प्रणालीवर आधारीत उपचारांचा लाभ घेतला आहे.


ब्रह्मतीर्थ
रवी मास्तर रूग्णांना वर्षातून एकदा 'ब्रह्मतीर्थ' म्हणजेच पवित्र पाणी देताता. त्यांना स्वयंभू ज्योतीमार्फत आगाऊ सूचना मिळते. नवग्रहांची शक्ती ब्रह्मगुरूंच्या शरीरावर केंद्रित झाल्यावर ते ही शक्ती पाण्यात विसर्जित करतात. त्यांच्या तेजाने पाण्यात लहरी निर्माण होऊन दैविक पाण्यात त्याचे रूपांतर होते. या पाण्याचे प्राशन करणार्‍याचे संपूर्ण पापहरण होते. त्यांना रोगांपासून मुक्ती मिळते. ब्रह्मगुरूंच्या मते मृत्यूनंतर काही आत्मे नरकात जातात. काही चंद्र मंडलात राहतात.

त्यालाच आपण स्वर्ग म्हणतो. या पाण्याचे प्राशन करणार्‍या व्यक्तींच्या कुटुंबीयांस कोणतेही क्रियाकर्म करावे लागत नाही. काळाची शक्ती त्यांच्यावर प्रभाव पाडू शकत नाही व त्यांना स्वर्गप्राप्ती होते. अनेक उदाहरणातून त्यांच्या उपचाराची क्षमता सिद्ध होते, असा त्यांचा दावा आहे. मात्र, विज्ञानाच्या कसोटीवर त्यांच्या या शक्तीचे पटेल असे स्पष्टीकरण मिळत नाही. काहीच्या मते हा सगळा मानसिक खेळ आहे. आपणास काय वाटते? स्पर्श किवा तीर्थसेवनाने व्याधी किवा रोगांवर उपचार करता येणे शक्य आहे?

Share this Story:

Follow Webdunia marathi