स्वप्नात माकडाने दिलेल्या दृष्टांताने चिंतित झालेले सरपंच शेजारच्या गावात 'नाग देवते'च्या मंदिरात गेले. तिथे एक व्यक्तीच्या अंगात नाग देवता येत असल्याची समजूत आहे. या नागदेवतेने सांगितलं, की माकडाने सांगितल्या प्रमाणे तुम्ही करा. माकडाला हनुमानाचा अवतार मानणा-या बरसी गावच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून माकडाचा दशक्रिया विधी केला. त्यासाठी प्रत्येक घरातून 5-5 की. ग्रा. धान्य व पैसे गोळा करण्यात आले. त्यासाठी आसपासच्या 15 गावातील लोकांना सामूहिक भोजनाचे निमंत्रणही पाठविले गेले. त्यानंतर हनुमान मंदिरात रात्रभर 'अखंड रामायण' वाचन करण्यात आलं.
एखादा माणूस मेल्यानंतर जशा विधी केल्या जातात त्याच माकडासाठी केल्या गेल्या. सरपंचासह 20-25 पुरुषांनी केशदान केले. उर्वरित विधी उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीवर केल्या गेल्या. या संपूर्ण विधीनंतर दुस-याच दिवशी गावात भरपूर पाऊस झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.
या घटनेला तुम्ही काय म्हणालं श्रद्धा की अंधश्रद्धा! पाऊस आला नाही हे माकडाचा कोप असू शकतो का? की माकडाचा धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर पाऊस येणे ही त्याची कृपा? श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा हा खेळ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा...