Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टायगर एअरलाइन्सची धम्माल ऑफर, 10 रुपयांत सिंगापूर!

टायगर एअरलाइन्सची धम्माल ऑफर, 10 रुपयांत सिंगापूर!
नवी दिल्ली , मंगळवार, 16 सप्टेंबर 2014 (16:08 IST)
एअरलाइन्स कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरू आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्या एकापेक्षा एक धम्माल ऑफर सुरु केल्या आहेत. स्पाइसजेट, इंडियन एअरलाइन्स, एअर इंडिया नंतर सिंगापूर एअरलाइन्सही या स्पर्धेत उतरली आहे. दुसरीकडे सिंगापूर एअरलाईन्सने तर केवळ 10  रुपयांमध्ये सिंगापूर दर्शनची ऑफर दिली आहे.
 
टायगर एअरची ही ऑफर कंपनीला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देण्यात आली आहे. टायगर एअरकडून दिल्या जाणार्‍या या ऑफरअंतर्गत 21 सप्टेंबर 2014 पर्यंत तिकीट बुक करावे लागेल. यानंतर 12 जानेवारी 2015 ते 31 मार्च 2015 आणि 21 जुलै 2015 ते 22 सप्टेंबर 2015 दरम्यान तिकीट बुक करता येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi