Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अवघ्या 5 मिनिटांत रेल्वे स्टेशनवर मिळणार पिझ्झा

अवघ्या 5 मिनिटांत रेल्वे स्टेशनवर मिळणार पिझ्झा
आता आयआरसीटीसीही रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या स्वप्नाबरोबरच प्रवाशांना त्याच वेगात खाणे पुरवण्यासाठी सज्ज झाली असून पुढील काही दिवसात आयआरसीटीसी रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे स्टेशनवर फूड मेकिंग मशीन बसवण्याच्या विचारात आहे. याची सुरुवात एटीपी मशीनने म्हणजेच एनी टाइम पिझ्झा देण्याच्या सर्व्हिसने होणार आहे. पाच मिनिटांमध्ये हा पिझ्झा मिळेल, असा दावा आयआरसीटीसीने केला आहे.
मुंबईच्या नितेश ठक्कर यांनी आआरसीटीसीच्या खास मशीनसाठी मेहनत घेतली आहे. या पिझ्झा मेकिंग मशीनची मूळ संकल्पना ही नेदरलँडची आहे. पिझ्झासोबतच पुढील काळात आणखी काही खाद्यपदार्थ तयार करता येतील यासाठीही काम सुरु आहे. एनी टाइम पिझ्झा मशीनमुळे रेल्वे प्रवाशांना कमीत कमी वेळेत शुद्ध आणि स्वादिष्ट पिझ्झा मिळणार आहे. सुरुवातीला ही मशीन मुंबईच्या वर्दळीच्या ठिकाणी बसविण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेतीत दिसला एलियन..