Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आम्ही सरकारला बेलआऊट मागितले नाही - मल्ल्या

आम्ही सरकारला बेलआऊट मागितले नाही - मल्ल्या

वेबदुनिया

मुंबई , बुधवार, 16 नोव्हेंबर 2011 (12:00 IST)
ND
कंपनीचे अध्यक्ष विजय मल्ल्या यांनी आज येथे सांगितले की "किंगफिशर एअरलाईन्स'ने सरकारकडे अर्थसाह्य मागितलेले नाही. बॅंकांनी किंगफिशरला सातशे ते आठशे कोटी रुपये कमी व्याजदरात द्यावेत, एवढेच आपले म्हणणे आहे.

किंगफिशरचे तिमाही निकाल जाहीर झाले. यात कंपनीला 468 कोटींचा तोटा झाल्याचे नमूद आहे. त्याबाबत मल्ल्या म्हणाले, आमच्यावरील कर्जाचा बोजा काही प्रमाणात कमी व्हावा व जास्त व्याजदराच्या कर्जांची परतफेड करता यावी, याकरिता आम्ही बॅंकांकडे लेटर ऑफ क्रेडिट मागितले आहे. मात्र, आम्ही बॅंकांकडे सवलत मागितली नाही. आमच्या कर्जाची फेररचना करावी, असेही आमचे म्हणणे नाही. अल्पकालीन खेळते भांडवल व व्याजाचा कमी दर याच केवळ आमच्या केवळ दोन मागण्या आहेत.


Share this Story:

Follow Webdunia marathi