Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक लीटर पेट्रोलमध्ये 100 किमी धावणारी कार

एक लीटर पेट्रोलमध्ये 100 किमी धावणारी कार
, शुक्रवार, 28 ऑगस्ट 2015 (11:10 IST)
टाटानं सर्वात स्वस्त कार टाटा नॅनो बाजारात आणून खळबळ माजवली होती. आता कंपनी आणखी एक धमाका करायला सज्ज आहे. यावेळी कंपनी एक अशी कार लॉन्च करतेय, जी नक्कीच सर्वाच्या मनावर राज्य करेल. कारण टाटा मोटर्स भारतात लवकरच 1 लीटर पेट्रोलमध्ये 100 किलोमीटर धावणारी कार लॉन्च करणार आहे. 
 
2016 पर्यंत ही कार बाजारात उपलब्ध होईल, अशी आशा आहे. टाटा मेगापिक्सेलच्या रुपात समोर येणारी ही कार दिसण्यातही आकर्षक असेल आणि यात खूप अत्याधुनिक फीचर्स असतील. टाटानं ही कार 82 व्या जिनेव्हा मोटर शोमध्ये प्रदर्शित केली होती. तेव्हा ती एक कॉन्सेप्टच्या रुपात होती. 
 
टाटा नॅनोसारखीच ही कार मध्यम वर्गाला नजरेसमोर ठेवून तयार केली गेलीय. चार सीट्स असलेली ही कार पर्यावरणासाठी अनुकूल असेल. कारमधून प्रति किलोमीटर अवघा 22 ग्राम कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होईल. टाटा मेगापिक्सेलमध्ये शानदार एक्सटेयिर आणि इंटेरिअर असेल. सोबतच पनारोमिस छप्पर, चार लोकांना बसण्याची जागा आणि टच स्क्रीन ऑल इन वन कमांड सेंटर असेल. या टचस्क्रीनमध्ये एसी, व्हेंटिलेशन, ड्रायव्हिंज मोड परफॉर्मेस आणि टेंपरेचर कंट्रोल करण्याचे फीचर्स असतील. सोबतच आपण आपला मोबाइलही टच स्क्रीनला कनेक्ट करून हेड्स फ्री मोजवर पण वापरू शकाल. कार पार्क करण्यासाठी पार्क असिस्ट सिस्टम पण असेल. 
 
टाटा मेगापिक्सेल जानेवारी 2016 मध्ये लॉन्च होऊ शकते. कंपनी लाँचिंगची तयारी करतेय, कारची किंमत 5 ते 6 लाख रुपयांदरम्यान असेल. टाटा मेगापिक्सेलमध्ये 325 सीसी सिंगल सिलेंडरचा वापर केला गेलाय. या कारमध्ये एक लिथियम आयन फास्फेट बॅटरी आणि चालत्या कारमध्ये रिचार्जसाठी पेट्रोल इंजिन जनरेटर लागलंय. टाकी फुल केल्यानंतर ही कार एकावेळी तब्बल 900 किलोमीटरपर्यंत चालवता येईल. कार 100 किमी/लीटर मायलेज देईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi