Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कांद्याच्या भावात घसरण सुरूच

कांद्याच्या भावात घसरण सुरूच
, मंगळवार, 13 सप्टेंबर 2016 (17:13 IST)
देशातील सर्वात मोठ्या असलेल्या लासलगाव मुख्य बाजार बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण सुरूच असल्याने कांद्याच्या भावातील विघ्न  काही कमी होताना दिसत नाही.2 सप्टेंबर ला उन्हाळ कांद्याला 650 रुपये प्रती क्विंटल असा भाव होता आणि आज 425 रुपये प्रती क्विंटल  भाव मिळत आहे.मागील आठवड्याच्या  तुलनेने कांद्याच्या दरात 34 टक्केने घसरले असल्याने शेतकरी वर्गाच्या चिंतेत आणखी वाढ झाल्याचे दिसत आहे. सपूर्ण देशात आणि एशियात नाशिक येथील कांदा बाजारपेठ मोठी आहे.
 
बाजार समितीकडून मिळलेल्या माहितीनुसार मागणीच्या तुलनेने पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असल्याने कांद्याचे दर हे घसरत आहे.तसेच बाजार समितीत येत असलेला उन्हाळ कांदा हा चार ते पाच महिना अगोदरचा असल्याने आणि या कांद्याला हवामानाचा फटका बसल्याने कांद्याची प्रत ही खालावलेली आहे त्यामुळे या कांद्याला कमी भाव मिळत आहे.कांद्याच्या लागवडीला एकरी एक हजार रुपये खर्च येत असून सद्या कांद्याला तीनशे ते चारशे रुपये भाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱयाला झालेला खर्च हि वसूल होत नसल्याने  शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.याकडे मात्र  कोणत्याच राजकारणी पक्षाला घेणेदेणेच राहिलेला नाही.यासाठी केंद्र सरकारने  नाफेड मार्फत निर्यातिला चालना द्यावी असे पत्र सुद्धा वाणिज्य खात्याला नाफेड ने पाठविले आहे.
 
सध्या बाजार समिती असलेला उन्हाळ कांद्याचे जीवनमान हे पाच ते सहा महिने असते,शेतकरी वर्ग हा कांदा चांगला भाव मिळेल या आशेने साठवून ठेवतो.परंतु यावेळेस मात्र सगळं आर्थिक गणितच बिघडल्या चे चित्र दिसत आहे.आज लासलगाव येथील मुख्य बाजार समितीत कांद्याला कमीत कमी १०० रुपये ,सरासरी  ४२५ रुपये तर जास्तीत जास्त ६६७ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले.जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट मध्ये २८लाख क्विंटल कांद्याचे लिलाव  जिल्ह्यातील 15 कृषी उत्पन्न बाजार समितीत माहे जुलै आणि ऑगस्ट मध्ये 28 लाख क्विंटल कांद्याचे लिलाव झालेले आहे.साधारणतः 1.94 लाख शेतकरी वर्गाला शासनाने मंजूर केलेल्या 100 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 27 करोड रुपयाची मदत मीळण्याची अपेक्षा आहे.
कांद्याचे दर
दिनांक।             सरासरी भाव
11 जून 2011        425
28 सप्टेंबर 2012    460
16 मे 2016           600
7 मे 2016            450
8 सप्टें 2016        425
कांद्याचे विघ्न  दूर करण्यासाठी साकारला कांद्याचा गणपती
सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने शेतकरी हा चिंतेत पडलेला असून परिसरातील एका शेतकऱ्याने कांद्याच्या दरातील सुरु असलेलेअरिष्ट दूर करन्यासाठी  कांदा यांचा वापर करून ईको फ्रेंडली गणपतीची तयार केलेला आहे. सरकारला जाग येण्यासाठी त्यांनी हा आगळा गणपती तयार केलेला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घृणास्पद : तीन वर्षीय पुतणीवरच दोन नराधम काकांनी बलात्कार केला