Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काळ्या पैशाबाबत खातेदारांची माहिती मागितली

काळ्या पैशाबाबत खातेदारांची माहिती मागितली
नवी दिल्ली , सोमवार, 30 जून 2014 (10:52 IST)
स्विसमधील बॅंकात दडवून ठेवलेल्या भारतीय  खातेदारांची माहिती द्यावी, असे पत्र अर्थमंत्रालयान स्वित्झर्लंड सरकारला पाठवले आहे. याशिवाय काळ्या पैशाचा तपास करण्‍यासाठी  स्थापन करण्‍यात आलेल्या एसआयटीने स्विस एजन्सींची माहिती  देण्याची विनंतीही त्या सरकारकडे केली आहे.

दरम्यान, यापूर्वी स्विस बॅंकांमधील काळ्यापैशाबाबत भारत सरकारला माहिती देण्‍यास स्विस सरकारने तयारी दर्शवली होती. तसेच  सरसकट नावांची यादी स्विस सरकारने पाठवली. परंतु यात नेमका  काळा पैसा कोणी दडवून ठेवला आहे, असे सांगणे कठीण आहे. या  पार्श्वभूमीवर काळ्यापैशाबाबत खाते‍निहाय माहिती पाठवण्याची विनंती  अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्विस सरकारला एक पत्र पाठवून केली  आहे.

स्विस बॅंकातील भारतीयांचा काळा पैसा परत आणण्यासाठी  अर्थमंत्रालयाकडून कठोर उपाययोजना करण्‍यात आल्याचेही  अर्थमंत्रालयाच्या एक अधिकार्‍याने सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi