Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्राइस वॉर: एयरटेलने फ्री केली इंटरनॅशनल रोमिंग, डाटावर भारी सूट

प्राइस वॉर: एयरटेलने फ्री केली इंटरनॅशनल रोमिंग, डाटावर भारी सूट
, बुधवार, 28 सप्टेंबर 2016 (15:26 IST)
देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी भारती एयरटेलने परदेश यात्रा करणार्‍या ग्राहकांना केंद्रित ठेवून बरेच नवीन ऑफर लाँच करण्याची घोषणा केली ज्यात इंटरनॅशनल रोमिंग दरम्यान इनकमिंग कॉल तथा भारताच मेसेज पाठवणे नि:शुल्क असेल.  
 
कंपनीने सांगितले की हे ऑफर सर्वच लोकप्रिय जागांसाठी उपलब्ध आहेत व नवीन इंटरनॅशल रोमिंग पॅक्समध्ये ग्राहक जास्त बिल येण्याची भिती न ठेवता इनकमिंग कॉलचा फायदा घेऊ शकतात आणि भारतातील कुठल्याही नंबरावर नि:शुल्क मेसेज पाठवू शकतात.  
 
त्याशिवाय या पॅक्सवर इंटरनॅशनल रोमिंगचा शुल्क देखील 650 रुपये प्रति एमबीहून कमी करून तीन रुपये प्रति एमबी करण्यात आले आहे.  
 
कंपनीने सांगितले की या ऑफर्समध्ये ग्राहक कुठल्याही स्थानीय नंबरावर भारतातील कुठल्याही नंबरावर मात्र तीन रुपये प्रति मिनिटाच्या दराने आउटगोइंग कॉल देखील करू शकतात. हे ऑफर ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्‍या टप्प्यापासून सुरू होणार आहे.  
 
कंपनीप्रमाणे नवीन पेशकश मध्ये एक दिवस, 10 दिवस व 30 दिवसांच्या वैधता असलेले पॅक्स उपलब्ध असतील. एक दिवसीय पॅक 10 डॉलरमध्ये, 10 दिवसीय पॅक 45 डॉलरमध्ये तथा एक महिन्याचे वैधता असणारे पॅक 75 डॉलरमध्ये उपलब्ध होतील.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्मार्टफोन न वापरणार्‍या चालकांना मोफत कॉफी देणारे अँप