Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फेसबुकच्या सीओओंनी घेतली मोदींची भेट

फेसबुकच्या सीओओंनी घेतली मोदींची भेट
नवी दिल्ली , शुक्रवार, 4 जुलै 2014 (10:23 IST)
जगातील अग्रेसर सोशल नेटवर्किंग साईट 'फेसबुक'च्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरील सॅंडबर्ग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सॅंडबर्ग या मोदींच्या खूप चाहत्या आहेत.फेसबुकवर मोदी जगातील दुसऱया क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय नेते आहेत. त्यांचे फेसुबकवर तब्बल १८ कोटी चाहते आहेत.

सरकार आणि नागरिक यांच्यामध्ये संवाद साधण्यासाठी आणि प्रशासनासाठी फेसबुकचा चांगला वापर होऊ शकतो, असे मोदी यांनी  सॅंडबर्ग यांची भेट घेतल्यानंतर म्हटले आहे. लोकांशी थेट संवाद  साधणे हे प्रशासनाच्या दृष्टीने काहीसे अवघड असते, याकडेही त्यांनी  लक्ष वेधले. परदेशी पर्यटक भारतात आणण्यासाठी फेसबुकचा कसा वापर होऊ शकतो, याबाबतही सॅंडबर्ग यांच्याशी बोलणे झाल्याचे मोदी  यांनी सांगितले.

सॅंडबर्ग यांनी निवडक पत्रकारांशी संवाद साधून त्या मोदींच्या चाहत्या असल्याचे म्हटल्या. सँडबर्ग म्हणाल्या, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे पहिल्या क्रमांकावर आहेत. मोदी यांनी निवडणुकीतील विजयानंतर आपल्या आईचा आशीर्वाद घेतल्याचे छायाचित्र फेसबुकवर टाकले होते. त्यांच्या या फोटोचे सॅंडबर्ग यांनी कौतुक केले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi