Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉस खूश झाल्याने 3 हजार कर्मचार्‍यांना दिला iphone-6

बॉस खूश झाल्याने 3 हजार कर्मचार्‍यांना दिला iphone-6
, शुक्रवार, 9 जानेवारी 2015 (15:29 IST)
इंफोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांनी आपल्या कंपनीत चांगल्या काम करणार्‍या कर्मचार्‍यांना एक खास उपहार दिला आहे. सिक्का यांनी आपल्या कंपनीतील 3000 कर्मचार्‍यांना आयफोन 6एस गिफ्ट केले आहे. 
तुम्हाला सांगायचे म्हणजे एका आयफोन 6एसची किंमत किमान 55 हजार रुपये आहे. या प्रकारे बघितले तर विशाल सिक्का यांनी कंपनीच्या कर्मचार्‍यांना किमान 16.50 कोटी रुपयांचे मोबाइल गिफ्ट केले आहे.
गिफ्ट सोबत सर्व कर्मचार्‍यांना एक मेल केला आहे, ज्यात सिक्का यांनी सर्व कर्मचार्‍यांना मित्र म्हणून संबोधले आहे. कंपनीच्या कर्मचार्‍यांनासाठी ही बाब फारच आश्चर्यकारक होती. 

या मेलमध्ये सिक्का यांनी कंपनीच्या कर्मचार्‍यांची प्रशंसा केली आहे. सिक्का म्हणाले की इंफोफिसला या जागेपर्यंत पोहोचवण्यामध्ये  कंपनीच्या कर्मचार्‍यांचा फार मोठा योगदान आहे.

सिक्का म्हणाले, "फक्त कामाची प्रशंसा करणे योग्य नसून या क्षणाला एका उत्सवाप्रमाणे साजरा करायला पाहिजे, म्हणून आमच्याकडून तुम्हा सर्वांना हॉलिडे बोनसच्या रूपात एक शानदार अॅप्पल आयफोन 6 गिफ्ट करण्यात येत आहे. हे गिफ्ट, जे तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना नेहमी हे लक्षात करवून देईल की तुम्ही कंपनीसाठी तुमचे बेस्ट दिले आहे."

Share this Story:

Follow Webdunia marathi