Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत 750 किलो कांद्याची चोरी

मुंबईत 750 किलो कांद्याची चोरी
, सोमवार, 24 ऑगस्ट 2015 (10:03 IST)
मुंबई- कांद्याचे भाव कडाडले आहेत. वाढले असले, तरी कुणी कांदा चोरेल का? नाही ना.. पण मुंबईत चक्क 750 किलो कांद्याची चोरी झाली आहे. प्रतीक्षानगरातील एका दुकानात ही चोरीची घटना घडली आहे.
 
कांद्याला सध्या सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळेच की काय, त्यामुळेच मुंबईच्या एका दुकानातून तब्बल 750 किलो कांद्याची चोरी झाली आहे. मुंबईतील प्रतीक्षानगरमधील एका दुकानदाराच्या दुकानातून शुक्रवारी रात्री कांद्याच्या 14 पोत्यांची चोरी झाली. याबाबत दुकानदाराने वडाळा पोलिसांत तक्रार दिली असून  पोलिसांनी छापेमारीचे काम सुरू केले आहे. दुकानदाराने रात्री साडेआठ वाजता 17 पोती कांदे आणि 14 पोती बटाटे मागवले होते. मात्र, सकाळी 14 कांद्याची पोती गायब झालेली. या अजब चोरीमुळे आता पोलीसही चक्रावले असून या चोरीचा तपास सुरु आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi