Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शीतल बनणार लंबोर्गिनी घेणारी पहिली भारतीय महिला

शीतल बनणार लंबोर्गिनी घेणारी पहिली भारतीय महिला
आपल्या देशात आलिशान गाडय़ांच्या शौकिनांची शौकीन कमी नाही. आपल्याकडे एखादी महागडी गाडी रस्त्यावर दिसली की आपोआप सर्वाच्या नजरा तिच्याकडे वळतात. मग ती जग्वार, ऑडी, मर्सिडिज, बीएमडब्ल्यू, रेंज ओव्हर असो. पण अशा कितीतरी गाडय़ांचे शौकिन आपल्या देशात आहेत. आता यादीमध्ये आणखी एक गाडीचे नाव नोंदवावे लागेल ते म्हणजे लंबोर्गिनी. 
कोलकाता येथील 40 वर्षीय शीतल दुगड या लंबोर्गिनी विकत घेणार्‍या पहिल्या भारतीय महिला बनल्या आहेत. शीतल दुगड यांनी लंबोर्गिनी हुराकेन खरेदी केली असून शीतल यादेखील आलिशान कार्सच्या शौकीन आहेत. गोल्डन शेड असलेल्या या शानदार कारला लंबोर्गिनी ‘ओरो इलिओस’ असेही म्हटले जाते. ही कार एक्सक्लुझिव असून ङ्खार कमी लोकांकडे ही कार आहे. या कारची किंमत 3.32 कोटी रूपये इतकी आहे, जी 100 किलोमीटर स्पीड केवळ 3.2 सेकंदात पूर्ण करू शकते. 
 
या कारची टॉप स्पीड 325 किलोमीटर प्रति तास इतकी आहे. शीतल यांचा विवाह उद्योगपती विनोद दुगड यांच्याशी झाला आहे. त्या म्हणतात की, लग्नावेळी मला गाडीही चालवता येत नव्हती. आता शीतल कोलकाता येथील सुपर बाईक क्लबमध्ये आरामात गाडी पळवते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संघाकडून इफ्तार पार्टी