Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिटी ग्रुपचे 'सीईओ' विक्रम पंडित यांचा राजीनामा!

सिटी ग्रुपचे 'सीईओ' विक्रम पंडित यांचा राजीनामा!

वेबदुनिया

WD
सिटी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पंडित यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पंडित यांच्या जागेवर कंपनीच्या संचालक मंडळाने मायकल कॉर्बट यांची नियुक्ती केली आहे.

पंडित यांच्या राजीनाम्यामागील कारण स्पष्ट करण्यात आले नाही, परंतु गेल्या महिन्यात संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात 88 टक्के घट नोंदविण्यात आली होती. हे यामागील प्रमुख कारण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह. राजीनाम्यानंतर दिलेल्या संदेशात त्यांनी कंपनीच्या सर्व सहकार्‍यांचे आभार मानले. सिटी ग्रुप एकेकाळी प्रचंड आर्थिक संकटात होता, परंतु पंडित यांच्या नेतृत्त्वात कंपनी मजबूत स्थितीत आली. संचालक मंडळानेही त्यांच्या योगदानाची दखल घेतली आहे. पंडित यांच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो, असे संचालक मंडळाने म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi