Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोने पाच हजाराने उतरणार?

सोने पाच हजाराने उतरणार?
मुंबई , शनिवार, 10 मे 2014 (12:14 IST)
जगभरातील सोनच्या किमती कमी होत असल्याने भारतातही सोन्यादे दर प्रति दहा ग्रॅम 25 ते 27 हजार रुपयांपर्यंत खाली उतरण्याची शक्यता आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,300 डॉलर इतके असून ते 1,150 ते 1,250 डॉलरपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे देशातील सोन्याचे  दरही कमी होणे अपेक्षित असल्याचे ‘इंडिया रेटिंग’चे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या सोन्यात  गुंतवणूक करणे फारसे हिताचे ठरणार नाही.

देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर 29,500 ते 30,000 रुपयांच्या आसपास आहेत. सोन्याचा्या आयतीवर निर्बध घालण्यात आल्याने देशी बाजारात सोन्याचे दर तीस हजाराहूनही अधिक झाले होते. साधारणपणे दीड हजार रुपयांचा प्रीमियम असल्याचे ने वपार्‍यांचे म्हणणे होते. पण सोन्याची उपलब्धता वाढल्याने दर 28 हजारांच्या आसपास खाली आले होते. अक्षयतृतीयेला मात्र पुन्हा सोन्याचे दर वाढून त्यांनी तीस हजाराचा आकडा गाठला होता. पण नजीकच्या   काळात सोन्यावरील निर्बध उठवले तर आयात वाढून सोन्याची उपलब्धता आणखी वाढेल. त्यामुळे सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर कमकुवत झाला तर गुंतवणुकीसाठी सोन्याचा पर्याय वापरला जातो. त्यामुळे सोन्याची मागणी वाढून त्याचे दरही वाढतात. आता अमेरिका आणि युरोपातील देशांची आर्थिक स्थिती सुधारत असल्याने डॉलरही वधारू लागला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोने हा गुंतवणुकीसाठी तितकासा आकर्षक पर्याय नसेल, असा होरा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi