Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हीरो होंडा उत्पादन क्षमता वाढविणार

हीरो होंडा उत्पादन क्षमता वाढविणार

भाषा

नवी दिल्ली , शुक्रवार, 28 ऑगस्ट 2009 (12:12 IST)
देशातील दुचाकी वाहन कंपन्यामधील अग्रेसर असलेली हीरो होंडाने चालू आर्थिक वर्षात हरिद्वार येथील युनिटची उत्पादन क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या युनिटमध्ये प्रतिदिन 2,000 दुचाकी वाहनांची अतिरिक्त निर्मिती केली जाणार आहे.

कंपनीकडून मिळालेली माहिती अशी की, हरिद्वार येथील युनिटमध्ये प्रतिदिन 2,000 मोटरसायकलचे अतिरिक्त उत्पादन घेतले जाणार आहे. कंपनीला यंदा विक्रीत आठ टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे.

कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल दुवा यांनी सांगितले की, हरिद्वार ये‍थील युनिटमध्ये प्रतिदिन 4,000 मोटरसायकलाची निर्मिती केली जाते. मार्च, 2010 पर्यंत 6,000 मोटरसायकल प्रतिदिन करण्याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi