Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

२०२० पर्यंत फेसबुकचा 'फेस' होणार गायब

२०२० पर्यंत फेसबुकचा 'फेस' होणार गायब
, बुधवार, 6 जून 2012 (15:52 IST)
PR
PR
फेसबुकवर अक्षरश: पोसलेल्या आजच्या पीढीस काही वर्षात फेसबुकवर अस्तित्वच संपृष्टात येणार असल्याचे सांगितल्यास विश्वास बसणार काय? मात्र फेसबुकच्या शेअर्सच्या सततच्या घसरणीनंतर हेज फंड व्यवस्थापकाने येत्या ५ ते ८ वर्षात फेसबुक गायब होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.

आयरनफायर कॅपिटलचे संस्थापक एरिक जॅक्सन यांच्यामते पांच ते आठ वर्षात फेसबुक गायब होईल. याहू सुद्धा याप्रमाणेच गायब झाले होते. याहू आजही पैसे कमावत आहे. ते आजही नफ्यात असून १३,००० कर्मचारी कार्यरत आहेत, मात्र २००० मध्ये जेव्हा याहू शीखरावर होते त्या तुलनेत आज फक्त १० टक्के आहे.

जॅक्सन यांच्यामते आतापर्यंत तीन प्रकारच्या इंटरनेट कंपनिया परिचालन करत आहेत. वेब पोर्टल याहू ऑनलाइन कंपनीत आघाडीवर आहे. फेसबुकने सोशल मेडियाच्या लाटेवर दुसर्‍या प्रकारात कब्जा केला. तीसरा प्रकार मोबाईल संबंधीत आहे.

जॅक्सनच्या या आकलनाने इंटरनेटवर या आठवड्यात चांगलाच हंगामा झाला. त्याची भविष्यवाणी सत्यात उतरल्यास मात्र व्यवसाय विश्लेषकास आश्चर्य होणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi