Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दहा रुपयांचे नाणे चलनातून बंद झाल्याची अफवा

दहा रुपयांचे नाणे चलनातून बंद झाल्याची अफवा
, गुरूवार, 11 मे 2017 (11:04 IST)
अभोणा शहरात व परिसरात दहा रुपयांचा डॉलर सध्या कोणीच स्वीकारण्यास तयार नसल्याने याबाबत संंभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
अभोणा शहरात दहा रुपयांचा डॉलर बंद झाल्याची अफवा पसरली आहे. याबाबत महाराष्ट्र बँकेत संपर्क साधला असता बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत दहा रुपयांचे डॉलर स्वीकारले जात नाही.
 
दहा रुपयाचे नाणे अधिकृतरित्या बंद झाले नसल्याने ते नाकारण्याचे कारणच नाही, असे शहरवासीयांचे म्हणणे आहे. अभोणा शहर हे येथील आदिवासी भागातील मोठी बाजारपेठ असल्याने खेड्या-पाड्यावरील आदिवासी नागरिक त्यांच्याजवळील असलेले नाणे बाजारपेठेत व्यापारी स्वीकारत नसल्याने त्यांची मोठी पंचाईत निर्माण झाली आहे.
 
किराणा दुकानात गेले तरी दहा रुपयांचा डॉलर घेण्यास नकार दिला जातो. दहा रुपयांच्या नाण्यांचे करायचे काय? असा प्रश्‍न परिसरातील जनतेला पडला आहे. मोदी सरकारने पाचशे, हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्या त्या बँकेत भरण्यासाठी मुदत दिली होती.
 
आतातर अचानक बँकेत नाणे स्वीकारत नसल्याने अभोणा परिसरातील नागरिक संभ्रमात पडले आहे. एखाद्या व्यावसायिकाने नाणे घेण्यास नाकारले तर दुसराही घेत नाही. सध्या दहा रुपयांच्या डॉलरबद्दल संभ्रमाचे वातावरण असल्याने भारतीय रिझर्व्ह बँक किंवा तत्सम अधिकार्‍यांनी या संदर्भात खुलासा करावा,अशी मागणी परिसरातून होत आहे.
 
दहा रुपयाचे नाणे जर बंद झाले नसेल तर आमजनतेचे नाणे नाकारण्याचे कारण काय ? हॉटेल, किराणा व्यावसायिक, भाजी विक्रेते, किरकोळ व्यावसायिक, बँक असे कोणीही दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास तयार नाही. नागरिकांमधून बँकांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. दहा रुपयाच्या नाण्याची देवाण-घेवाण बँकेत सुरळीत व्हावी अशीही मागणी परिसरातून होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरापोव्हाला वाईल्ड कार्ड