जॅग्वार लँड रोव्हर इंडियाने नवीन जॅग्वार एक्सई ही कार लाँच केली आहे. एस आणि एसई डेरिव्हेटिव्हमध्ये उपलब्ध असलेली नवीन जॅग्वार एक्सई 184 केडब्ल्यू इंगेनियम टूर्बो चार्ज्ड पेट्रोल पॉवरट्रेन आणि 132 केडब्ल्यू इंगेलियम टूर्बो चार्ज्ड डिझेल पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या गाडीची किंमत 44.98 लाख रूपये असून बुकिंगला सुरुवात झालची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
जॅग्वार लँड रोव्हर इंडिालि. (जेएलआरआएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी यांनी ही माहिती दिली. जॅग्वार एक्सई ही खास डिझाइन केलेली कार आहे. ही कार उत्तम कागिरीची खात्री देते.
नवीन जॅग्वार एक्सईमध्ये डिझाइन, तंत्रज्ञान व ड्राव्हिंग डायनॅमिक्स याचे उत्तम उदाहरण आहे.
जॅग्वार एक्सई पूर्वीपेक्षा अधिक मोठी आहे. मोठे फ्रंट अॅर्पेचर्स, आकर्षक ग्राफिक्स नवीन ऑल-एलईडी हेडलाइट्ससह आकर्षक मजेफ ब्लेड डेटाइम रनिंग लाइट सिग्नेचर आणि अॅनिमेटेड डारेक्शनल इंटीकेटर्स अधिक आकर्षक लूक देते. कारच्या मागील बाजूस नवीन बम्पर डिझाइन आणि बारीक ऑलएलईडी टेल-लाइट्ससह अपडेटेड सिग्नेचर ग्राफिक्स आहे. ज्यामुळे कारच्या व्हिज्युअल आकर्षक- त्यामध्ये अधिक भर पडते. तसेच 43.18 सेमी (17 इंची) व्हील्स आहेत.
खास तार केलेल्या नवीन इंटीरिअरमध्ये उच्च दर्जाचे साहित्य, कोमल स्पर्श देणारे पृष्ठभाग, प्रीमिअम वेनीअर्स आणि आकर्षकता नवीन डोअर ट्रिम्स आहेत. एफ-टाइपप्रमाणे जग्वार स्पोर्टशिफ्ट सिलेक्टर 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये जलदपणे मॅन्युअल गिअर बदल करण्याची सुविधा देते. 25.4 सेमी (10 इंची) टचप्रोफ इन्फोटेन्मेंट स्क्रिन, तसेच स्मार्टफोन पॅक (अँड्रॉईड ऑटो व अॅप्पल कार प्ले) आहे. तसेच ड्रायव्हर सीटसाठी स्मार्ट सेटिंग्जसह एआ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), मिरर, ऑडिओ व क्लायमेट सेटिंग्ज, लेन किप असिस्ट व ड्रायव्हर कंडिशन मॉनिटर, ऑनलाइन पॅक (वाय -फायसह प्रो सर्विसेस, जे रिअल टाइम ट्राफिक माहिती, डोअर-टू-डोअर मार्ग आणि आगमनाचा अंदाजे वेळ अशा सेवा देते), फोनच्या माध्यमातून इंधनाची पातळी, विंडो ओपन अशा वाहनाच्या स्थितीबाबत तपासणी करण्याची सुविधा देणारे इनकंट्रोल रिमोट अॅपसह रिमोट, कनेक्टेड नेव्हिगेशन प्रो नेव्हिगेशन सिस्टिम, वायरलेस डिवाईस चार्जिंग, 3डी मॅप्स दाखवण्यासाठी हाय डेफिनिशन सुस्पष्ट ग्राफिक्चा वापर करणारे इंटरअॅक्टिव्ह ड्रायव्हर डिस्प्ले अशी खास वैशिष्ट्ये या कारमध्ये आहेत.