7th Pay Commission Update:सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी बातमी आली असून DA वाढीची प्रतीक्षा संपली आहे. डीए वाढीला सरकारने मंजुरी दिली आहे आणि डीएमध्ये 3% वाढ जाहीर केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश सरकारने (एमपी सरकार) राज्यातील वीज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही भेट दिली आहे. एमपी पॉवर मॅनेजमेंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सरकारने ही भेट दिली आहे.
महागाई भत्ता 34 टक्क्यांपर्यंत वाढला
आतापर्यंत मध्य प्रदेशातील वीज कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळतो. मात्र आता सरकारने 3 टक्के वाढ जाहीर केल्यानंतर ती 34 टक्के झाली आहे. सुमारे 30 हजार कर्मचाऱ्यांना या वाढीचा लाभ मिळणार आहे. आता कर्मचाऱ्यांना 1 ऑगस्ट 2022 पासून एकूण 34 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.
मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची
माहिती राज्य सरकारने दिली. मध्य प्रदेशात निवडणुकीच्या रणधुमाळीत कर्मचाऱ्यांना खूश करण्याची ही कसरत मानली जात आहे. मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा वाढणार आहे.
यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 वरून 34 टक्के केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मध्यप्रदेशातील 7.5 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. याशिवाय केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ताही 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. याबाबत सरकारकडून लवकरच घोषणा अपेक्षित आहे.