Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात 1 सरासरीच्या 85 टक्के पेरणी

राज्यात 1 सरासरीच्या 85 टक्के पेरणी
, गुरूवार, 27 जुलै 2023 (22:09 IST)
85 percent sowing of 1 average in the state राज्यात 120 लाख 37 हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या 85 टक्के पेरणी झाली आहे. यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा येथे अधिक पेरणी झाली असून सांगली, ठाणे, पुणे, सोलापूर, गडचिरोली येथे कमी पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी सोयाबीनची 111 टक्के आणि कापसाची 96 टक्के झाली आहे.
 
जास्तीच्या पावसामुळे पेरणी वाया गेली किंवा दुबार पेरणीची वेळ आल्यास महाबीजने संपूर्ण नियोजन केले आहे, अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यावेळी शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. 120.68 लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. मागील वर्षी खरीप हंगामात 96.62 लाख शेतकरी सहभागी झाले होते.
 
नाशिकमध्ये 72 टक्के पेरणी
राज्यात सर्वत्र पावसाची जोरदार हजेरी लागणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. अनेक जिल्ह्यांमधील धरणे भरली असून यातील काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागला आहे. संपूर्ण राज्यात पाऊस चांगला बरसत असला तरी नाशिकवर मात्र पावसाची अजूनही कृपादृष्टी झालेली नाही. याचा फटका शेती कामांना बसला आहे. जिल्ह्यातील केवळ 72 टक्के इतकेच पेरणी क्षेत्र झाले आहे. त्यामुळे पुढील काळात पुरेसा पाऊस झाला नाही तर, शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.
 
येवल्यात 105 टक्के कापूस लागवड
जून महिन्याच्या सुरुवातील नाशिक जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली, पण त्यानंतर पावसाने मारलेली ओढ अद्यापही कायम आहे. अधून मधून बरसणाऱ्या पावसाशिवाय अजूनही दमदार पावसाला म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. पावसाचे तालुके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पाऊस झाला असला तरी याठिकाणी जेमतेम पेरणी झाल्याचे दिसून येते. त्र्यंबकेश्वरला 40.35 तर, इगतपुरीत 71.31 टक्के इतकी पेरणी झाली आहे. येवल्यामध्ये कापसाचे क्षेत्र असल्यामुळे याठिकाणी 105 टक्के इतकी कापूस लागवड झाल्याचे दिसून येते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यावर ईडीची कारवाई होणार ? शिक्षण विभागाचा भ्रष्टाचार विधानसभेत गाजला