सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी एटीएफ दरात सलग दुसऱ्यांदा कपात करण्याची घोषणा केली आहे. या कंपन्यांनी एटीएफ दर 2.1 टक्क्यांनी कमी केले आहेत. बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दर लागू करण्यात येणार असल्याचे या कंपन्यांनी म्हटले आहे.
आयओसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत एटीएफ दर 812.33 रुपये प्रती किलोलीटरपर्यंत कमी करण्यात आले आहेत. आता राजधानीत 37084.50 प्रती किलोलीटर दरात तेल मिळणार आहे.
आयओसी, भारत पेट्रोलियम, आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने यापूर्वी 16 सप्टेंबर रोजीही तेलाच्या दरात कपात करण्याची घोषणा केली होती.