सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी या महिन्यात दुसऱ्यांदा विमानांसाठी लागणार्या इंधन दर (एटीएफ) कपात करण्याची घोषणा केली आहे.
इंडियन ऑइलने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत एटीएफ दर 649 रुपयांनी अर्थात 1.6 टक्क्यांनी कमी करत 39, 319 रुपये प्रती किलोलीटरवर आणले आहेत.
यापूर्वी देशातील तेल कंपन्यांनी एक डिसेंबर रोजी तेल दरात एक टक्क्यांची कपात करण्याची घोषणा केली होती. मुंबईत आता एटीएफ दर 40, 560 रुपये प्रती किलोलीटरवर आले आहेत.