सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे .या काळात सोनं खरेदी करणं एक चांगली गुंतवणूक ठरू शकते.सोन्याचे दर सातत्याने कमी होत आहे.मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (एमसी एक्स) वर सोन्याचे दर प्रति तोळा 2000 रुपयांनी घसरले आहे.
एमसीएक्सच्या तज्ज्ञाच्या मते,ही घसरण जास्त दिवस राहणार नसून येत्या जुलै नंतर सोन्याचे दर वाढू शकतात.तज्ञ सांगतात की ही घसरण तात्पुरती म्हणजे अस्थायी आहे सध्या सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल.
सोन्याच्या सध्याच्या दरापेक्षा दर लवकर पलटतील आणि सोन्याचे दर 48 ,500 रुपये प्रति तोळा होण्याची शक्यता आहे.
गुड रिटर्न्स वेबसाइटच्या माहितीनुसार, शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 47,410 रुपयांवरून कमी होत 47,350 रुपये प्रति तोळा झाली आहे. तर चांदीचे दर 70,300 रुपये प्रति किलोग्रॅमवर आले आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 60 रुपये प्रति तोळाने कमी होत 48,350 रुपये झाला आहे. जर तुम्ही सोनं खरेदी करण्याची योजना आखत असाल, तर ही आपल्यासाठी सुवर्णसंधी आहे.