सेन्सेक्समध्ये विक्रमी उसळी, दहा वर्षाच्या तुलनेत सर्वोच्च पातळीवर

सोमवार, 20 मे 2019 (16:43 IST)
एक्झिट पोलचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला आहे. शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज विक्रमी उसळी घेतली. त्याचबरोबर निफ्टीही वधारला. सेन्सेक्स १,४२१.९० अंकांनी वाढून ३९,३५२.६७ अंकावर बंद झाला. तर निफ्टी ४२१ अंकांनी वाढून ११,८२८ वर पोहचला. गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत सेन्सेक्सने गाठलेली ही सर्वोच्च पातळी आहे.
 
सकाळच्या सत्रात बॉम्बे स्टॉक एक्सेंज ९४६ अंकांनी वधारून ३८,८७७.०१ वर सुरू झाला. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सेंजही २४७ अकांनी वाढून ११, ६५१. ९० वर सुरु झाला. शुक्रवारी सेन्सेक्स ३७,९३०.७७ वर बंद झाला होता, निफ्टी ११, ४०७.१५ वर बंद झाला होता. एक्झिट पोलमधील अंदाज आता सत्यात उतरल्यास बाजारात तेजी दिसून येईल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख विरोधकांसाठी २३ मे दुपारी १२ वाजेपर्यंत स्वप्नकाळ